राहुरी/वेबटीम:- श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी केरळ राज्यातील तस्कर टोळीस नगर मनमाड महामार्गार राहूरी फॅक्टरी येथे ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी फँक्टरी येथील श्री.छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर नगर मनमाड महामार्गावर केरळ राज्यातील एम.एच. 16 बीसी-7999 या क्रमांकाच्या सम्राट कंपनीच्या टेम्पोमधून पाठीमागील बाजूस हौदाच्या खाली चंदन टाकून त्यावर लोखंडी प्लेट फिट करून हा टेंपो मध्यप्रदेश बुऱ्हाणपूर येथे जात असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता मिटके यांच्या पथकातील राहुल नरवडे यांनी देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांना सदर टेम्पो अडविण्याची सूचना दिली.त्यानुसार स्थानिक खासगी इसम दासू पठारे, श्रीकांत नालकर व इतर तीन ते चार जणांनी टेम्पो अडविण्याकामी गणेश फाटक यांना मदत केली. टेम्पो अडविल्यानंतर सदर टेम्पो मोकळा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत होते. परंतु पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर टेम्पो चालक व साथीदार यांना पोलीस हिसका दाखवताच त्यांनी टेम्पोच्या हौद्यात खालच्या बाजूला चंदन लपून ठेवल्याचे सांगितले. पोलिसां समक्ष टेम्पोतील लोखंडी प्लेटाचे नट बोल्ट खालून व वरून खोलून लोखंडी प्लेट बाजूला करून सुमारे 650 किलो चंदन या प्लेटाच्या खाली सापडले.त्याची किंमत 61 लाख रुपये तर १० लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 71 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याचे डीवायसएसपी संदीप मिटके यांनी सांगितले.
६१ लाख रुपयांचे चंदन पकडल्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालक व साथीदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अब्दुल फकरूद्दीन रहेमान (वय 41 वर्ष रा. अमितकला हाऊस ता.ऐनमाकजा जि.कासारगुड ), अब्दुल मोहम्मद निसाद (वय 32 वर्षे राहणार अंजामैल हाऊस ता. बैदाडका. जिल्हा कासारगुड, ) हे नाव सांगून केरळ राज्यातील रहिवासी असल्याचे सांगितले.सदर चंदन मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर येथे घेऊन चाललो असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी चंदनाचा टेम्पो पकडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
राहूरी पोलीस ठाण्यात टेम्पोचालक व त्याचा सहकारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची करवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवडे, सुनील दिघे,सुरेश औटी, गणेश फाटक जानकीराम खेमनर राजेंद्र आरोळे यांनी केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत