कर्जत(वेबटीम) राशीन जवळ सॉलिसिटर डेअरीची 3 वेळा जाळपोळ करून ७ लाख रुपयांचे नुकसान केलेल्या आरोपीस कर्जत पोलीसांनी शिताफीने केले अटक केली आ...
कर्जत(वेबटीम)
राशीन जवळ सॉलिसिटर डेअरीची 3 वेळा जाळपोळ करून ७ लाख रुपयांचे नुकसान केलेल्या आरोपीस कर्जत पोलीसांनी शिताफीने केले अटक केली आहे.
तक्रारदार नितीन नवनाथ वाघमारे वय ३० वर्ष धंदा सुपरवायजर रा.पिंपरी चिंचवड, पुणे, हल्ली रा.गणेशवाडी, ता. कर्जत, जि .अ.नगर हे कर्जत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली, दि. १४/०६/२०२१ रोजी रात्री १०.०० वा. दि. १५/०६/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्ती ने आमचे सॉलिसीटर डेअरी या प्लॅन्टचे बंगल्यातील ऑफिस, स्टोअर रूम व जनरेटर रुममधील साहित्यास आग लावून सुमारे सात लाख रुपये किमतीचे साहित्याचे जाळून नुकसान केले आहे. यापूर्वी सुद्धा एकदा दुचाकी आणि एकदा किरकोळ साहित्य जाळले होते. त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल होते.
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागत नव्हता. पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार मारुती काळे, तुळशीदास सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, संपत शिंदे यांनी गणेशवाडी येथे घटनाठिकाणी भेट दिली.
असा प्रकार 3 वेळा झाला होता. डेअरी मालकांना आणि पोलिसांना सुद्धा आरोपी गुंगारा देत होता.
सॉलिसीटर डेअरी या प्लॅन्टची पाहणी केली. सदरची घटना ही स्थानिक रहिवासी असलेल्या कोणीतरी कामगारांनी केल्याबाबत शंका आली. त्यावरून वरील पोलीस अधीकारी आणि पोलीस जवान यांनी सदर प्लॅन्टचे आसपास फिरुन गुप्त बातमीदारांना भेटुन सदरची माहीती सांगितली. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या 14 लोकांना कसून विचारपूस केली त्यावेळी राहुल सत्यवान मोरे रा. खेड ता. कर्जत जि. अहमदनगर यास काही दिवसापूर्वी कामावरून काढून टाकले होते व घटना घटले दिवशी रात्री प्लॅटजवळ फिरत होता अशी माहीती मिळाली. पोलीसांनी खात्री केली की सदरचा गुन्हा हा डॉ. राहुल सत्यवान मोरे रा. खेड ता. कर्जत याने केला आहे.
राहुल मोरे याचे राहते घरी सापळा लावुन त्याच दिवशी ताब्यात घेवून कर्जत पोलीस स्टेशन येथे आणले. त्यास कसून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावेळी पोलीसांनी त्यास गुन्हा का केला असे विचारले असता त्याने सांगितले की, मी गणेशवाडी येथील सॉलिसीटर डेअरी या प्लॅन्टमध्ये कामास होतो त्यावेळी कामाचे पैसे दिले नाही याचा राग मनात धरुन मी हा गुन्हा केला आहे असे सांगितले.
३७४/२०२१ भा.द.वी कलम ४३६,४२७ प्रमाणे गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मारुती काळे हे करीत आहेत.
सदरची धाडसी कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, पोलीस हवालदार मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, संपत शिंदे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत