राहुरी/वेबटीम:- कोवीड महामारीने अनेक कुटुंबातील कमावते पुरुष गमावल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.त्यातुन कुटुंबात केवंळ घरका...
राहुरी/वेबटीम:-
कोवीड महामारीने अनेक कुटुंबातील कमावते पुरुष गमावल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.त्यातुन कुटुंबात केवंळ घरकाम करणारी महिलेला आपल्या चिल्यापिल्यांचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता पडली असुन त्यांना शासनाने मदतीचा हात दिला तरच हि कुटुंब मुख्य प्रवाहात रहातील अन्यथा भविष्यात या बेसहारा कुटुंबामुळे नवीन सामजीक प्रश्न निर्माण होतील,त्यासाठी शासनाने या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारत त्यांना आधार देण्याची मागणी श्री दत्ता कडुपाटील यांनी मा मुख्यमंत्री , ना आदित्य ठाकरे तसे अनाथांचे नाथ महिला व बालकल्याण राज्यमंत्री ना बच्चुभाऊ कडु यांचेकडे आग्रही मागणी केली आहे.
शासनाने आईवडिल दोन्ही गमावल्याने अनाथ झालेल्या मुलांमुलीसाठी ५ लक्ष मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवुन तो सज्ञान झाल्यानंतरच त्याला देण्याची नवीन योजना आणली आहे.त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करतानाच घरातील कर्ता पुरुष गमावल्याने अल्पंशिक्षित व केवळ घरकाम करणा-या महिलेला आपला संसार कसा चालविण्याची पडलेली चिंता मा मुख्यमंत्री , ना श्री आदित्य ठाकरे तसेच ना बच्चुकडे यांचे निदर्शनास आणुन दिली आहे.
अल्प उत्पन्न असलेल्या विधवा महिलेस संजय गांधी निराधार योजनेतून रु १२०० प्रतीमाह मदत केली जाते.परंतु या तुटपुंज्या रकमेत कुटुंब चालविणे महाकठीण आहे.त्यासाठी घरात कर्ता पुरुष करत असलेला व्यवसाय व उदरनिर्वाहाचे साधन नव्याने या महिलेस उभारतां यावे यासाठी अर्थसहाय्य केल्यास महिलेला या संकटातून सावरण्यास मदत मिळणार आहे.या कुटुंबातील मुलांना शैक्षणीक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे भवितव्य घडण्यास मदत होणार आहे,यासाठी शासनाचे विविध आथीॅक विकास महामंडळातुन प्राध्यान्याने विनाव्याज छोटी कर्ज उपलब्ध करुन देणे, तसेच शासकिय वसतीगृहात या मुलांना काही प्रवेश राखीव ठेवणे तसेच घरातील व्यक्तींना कौशल्य विकासांचे प्रशिक्षण देणे यासारखे उपाय करावेत असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.
कोवीड महामारीनंतर उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत अश्या गरिब निराधार कुटुंबाचे पुर्नवसन होणे गरजेचे असुन त्यातुन हि कुटुंबे सावरली नाहीतर तर त्यातुन नवीन सामाजीक प्रश्न निर्माण होतील. आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे कुटुंबास शासन ज्या पध्दतीने मदत करुन त्याचे प्रती दायित्व निभावत आहे अगदी त्याच धतीॅवर या विधवा स्रीयांचे व कुटुंबाचे पालकत्व मायबाप सरकारने स्वीकारण्याची कळकळीची विनंती त्यांनी शेवटी आपल्या मागणीत केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत