महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहताहेत- वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहताहेत- वहाडणे

  कोपरगाव प्रतिनिधी   कार्यक्षम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निरोप समारंभातील माझे भाषण रेकॉर्ड केलेले आहे. माझ्या विरुद्ध बोलायला भाज...

 कोपरगाव प्रतिनिधी  

कार्यक्षम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निरोप समारंभातील माझे भाषण रेकॉर्ड केलेले आहे. माझ्या विरुद्ध बोलायला भाजपचे नगरसेवक कमी पडले म्हणून कि काय, आता महिलांना पुढे करुन कोल्हे मला बदनाम करू पाहत आहेत. तुमचे नगरसेवक तर तुमच्या धाकाने निरोप समारंभासही उपस्थित राहू शकत नाहीत. माजी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर याही कार्यक्षम होत्या यात शंकाच नाही. परंतु त्यांच्यावर तुमचाच दबाव होता हे सर्व जनतेलाही माहीत आहे. मी त्यांचा अवमान केलेलाच नाही, फक्त अनुभव सांगितले असे जोरदार प्रत्युत्तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विरोधकांना दिले आहे.

मुख्याधिकार्‍यांच्या निरोप समारभंतील भाषणावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, माजी आमदार ताईंचा मला आलेला व येत असलेला कटू अनुभव कोपरगावकर रोज अनुभवतात. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माजी आमदारांनी पालिकेला एक ढबूचाही निधी दिलेला नाही व मिळूही दिलेला नाही. दिला असल्यास तसे जाहीर करावे. त्याउलट त्यांनी पालिकेला माझ्या प्रयत्नातून मिळालेला 2 कोटी रुपये विशेष रस्ता निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला. तो मनमानी करून वापरला. त्यातील काही कामे 2 वर्षांपासून अपूर्ण आहेत. ती का झाली नाहीत याचे उत्तर कोण देणार? 40 वर्षे कोल्हे घराण्यात आमदारकी असताना, नगरपरिषदेत सत्ता असतानाही शहरात महिलांसाठी एकही स्वच्छता गृह का नाही? तुमच्याकडे उत्तरच नाही. मी तरी शहरात दोन ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृह उभारले, तरी तेही कमीच आहेत असे मी मानतो असेही ते म्हणाले.

दरम्यान, महिलांच्या मान सन्मानाबद्दल बोलण्याचा कोल्हे गटाला नैतिक अधिकार आहे का? तुमच्या अवतीभवती असलेल्या काहींचे किस्से अजूनही शहरात चर्चिले जातात. वृत्तपत्रातूनही गाजलेले आहेत. कोल्हे यांची इच्छा असल्यास मी त्यांची नावे घेऊनही ते किस्से सांगू शकतो. मात्र, मला असे किळसवाणे राजकारण करायचे नाही असा टोलाही लगावला. मी तर जागतिक महिला दिनानिमित्त दोनदा पालिकेच्या अध्यक्षपदी महिलांना बसण्याचा मान दिला. त्यात कोल्हे गटाच्या नगरसेविकाही होत्या. मी महिला नगरसेविकांशी कशा पद्धतीने वागतो-बोलतो हे तुमच्याच नगरसेविकांना विचारून बघा. आजही कोल्हे गटाच्या काही महिला नगरसेविकांचे पती किंवा सुपूत्रच नगरसेवक म्हणून वावरतात याची शरम कोल्हे गटाला वाटत नाही का? तुम्ही मला शहाजोगपणा शिकवू नका. आमदारपद गेले म्हणून कोल्हे गट राजकारणाची पातळी सोडून आरोप करत आहे. मी शहीद जवानांच्या वीर पत्नीच्या हस्ते दोनदा ध्वजारोहण केले. अनेकदा जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम महिलांच्या हस्तेच करत आहे. मी माझा वाढदिवस कोविडमुळे मृत झालेल्या सफाई कर्मचार्‍यांच्या विधवा पत्नीचा सन्मान करून साजरा केला, त्यांच्याच घरी भाजी भाकरी खाल्ली. कोल्हे गटाने भान ठेवून राजकारण करावे. 


महाराष्ट्र शासन आशा सेविकांना महिना फक्त एक हजार रूपये मानधन देत असतांना मी सर्वसाधारण सभेत माझ्या अधिकारात विषय घेऊन त्यांना महिन्याला प्रत्येकी दोन हजार रूपये मानधन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. अत्याचारित मुस्लिम भगिनीला दत्तक घ्यायचे मीच जाहीर केले. मृत वेश्यांच्या 4 अनाथ मुलींनाही मीच स्नेहालयात दत्तक घेऊन ठेवले. तुम्ही संजीवनी कारखान्यात किती महिलांना राखीव जागा ठेवून नोकर्‍या दिल्या हे सांगा, त्यानंतरच माझ्याविषयी पत्रकबाजी करा. येसगाव पाटावर महिलांची विटंबना होत होती तेव्हा तुम्ही त्याविषयी कधी बोलले का, त्यांना मदत केली का? जमलेच तर उत्तर द्या, असे आव्हानही वहाडणे यांनी विरोधकांना दिले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत