मुद्रकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश व्हावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुद्रकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश व्हावा

  राहुरी(बाळासाहेब वाघ) लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणार्‍या हॉस्पिटल्स, कोव्हीड सेंटर व लॅब सारख्या घटकांना लागणारे प्रिंटिंग मटेरिअल हा ...

 राहुरी(बाळासाहेब वाघ)

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणार्‍या हॉस्पिटल्स, कोव्हीड सेंटर व लॅब सारख्या घटकांना लागणारे प्रिंटिंग मटेरिअल हा अती महत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मुद्रण व्यवसायिक व त्या संबंधीत व्यावसायिकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन (दि.०४ जून) राहुरी तालुक्यातील मुद्रकांच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनकाळत हॉस्पिटल्स, मेडीकल, लॅब, कोव्हीड केअर हेल्थ सेंटर यांना आवश्यक असणारे प्रिस्कीप्शन लेटर, फाईल्स, विविध सूचनांचे फ्लेक्स बोर्ड, विविध आजारांसंबंधी माहिती पत्रके, सरकारी कार्यालतील स्टेशनरी, ओळखपत्र तसेच वृत्तपत्रांची छपाई आदी कामांसाठी मुद्रकांची गरज पडते. त्यामुळे प्रिंटींग व्यावसायिक हे अत्यावश्यक सेवेतील एक महत्वाचा दुवा असल्याने मुद्रक व्यावसायीकांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश होणे गरजेचे आहे. तरी सर्व मुद्रण व्यवसायिक व त्या संबंधीत व्यावसायिकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश व्हावा. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून आम्हाला व्यावसाय करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.


यावेळी प्रताप भांड, श्रीकांत शेजुळ, बाळकृष्ण वाघ, नितीन देशमुख, सागर ओस्तवाल, प्रदीप भोर, बाळासाहेब माकोणे, देविदास कोठुळे, सुनिल पवार, महेश गुलदगड, आरिफ पठाण,  विजय शिंदे, अजय वाघ आदी मुद्रण व्यावसायिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत