राहूरी फॅक्टरी(वेबटीम) डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मयत कामगारांच्या कुटूंबियांना राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्यावत...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मयत कामगारांच्या कुटूंबियांना राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्यावतीने मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले.
तनपुरे कारखान्यात नोकरी करत असलेल्या कामगारांना साखर कारखाना कामगार युनियनने नेहमीच अग्रेसर मदतीची भूमिका घेतले. तनपुरे कारखान्यात सुरक्षा विभागात नोकरीस असलेले जगन्नाथ जाधव व गोरख रनवरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असता त्यांच्या कुटूंबियांना राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्यावतीने मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले.
यावेळी युनियचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, युनियन जनरल सेक्रेटरी बाळासाहेब ढोकणे, कारखान्याचे जनरल सेक्रेटरी गजानन निमसे, बाबासाहेब मुसमाडे, नामदेव गलांडे, बाळासाहेब मुसमाडे, नारायण मुसमाडे, इंद्रभान पेरणे, गोरख पवार आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत