कोपरगाव/प्रतिनिधी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता.१९) उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार...
कोपरगाव/प्रतिनिधी
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता.१९) उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोपरगाव शिवसेना शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांच्या समन्वयाने प्रभाग पाचमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर जंतूनाशक औषध फवारणी करण्यात आली.
याकामी विभाग प्रमुख मयूर दळवी, निशांत झावरे, जुबेद अत्तार, कृष्णा दळवी, अमोल देवकर, समाधान कंदे, किरण घेगडमल, संकेत मंडलिक आदी शिवसैनिक उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांनी शिवसैनिकांचे आभार मानत कौतुक केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत