बारागाव नांदूरच्या होमपीचवर ना.तनपुरे कोणाला खेळवणार ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बारागाव नांदूरच्या होमपीचवर ना.तनपुरे कोणाला खेळवणार ?

राहूरी(गोविंद फुणगे)    जिल्हा परिषद निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना आता इच्छुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. बारागाव नांदूरच्या होम...

राहूरी(गोविंद फुणगे)

 
 जिल्हा परिषद निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना आता इच्छुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. बारागाव नांदूरच्या होमपीचवर स्व.शिवाजीराजे यांचे सुपुत्र धनराज गाडे यांना खेळविण्याचे संकेत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले असून, त्यांना जोरदार बॅटिंग करण्याचा गुरुमंत्रही दिला आहे. मात्र याचवेळी गेल्या पाच वर्षांपासून 'पॅड'  बांधून बसलेले धीरज पानसंबळ यांचा मंत्रीमहोदयांनी केलेल्या या विधानामुळे काहीसा 'धीर'  सुटताना दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी खासगीत बारागाव नांदूर गटातून आपल्याशिवाय कुणी फलंदाजीला उतरले तर प्रसंगी गोलदांजीसाठी मला उतरावे लागेल, असे सूचक वक्तव्य केल्याने आगामी निवडणुकीत येथे गाडे-पानसंबळ असा सामना पहायला मिळू शकतो.
बारागाव नांदूर(ता.राहुरी) जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी धनु तू चांगली बॅटिंग कर, मी तुझ्या पाठीशी ! अशा आशयाची बातमी "आवाज जनतेचा" या न्यूज पोर्टला झळकताच राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांच्या गोटात एकच खळबळ उडाली.त्यांनी तात्काळ आमच्या प्रतिनिधींशी संपर्क सांधून जिल्हा परिषदेचा मैदानात मी पुर्ण ताकतीशी उतरणार असून कोण बॅटिंग करणार आणि कोण कुणाचा क्लीन बोल्ड करणार,  ते पाहू , असं खुल आव्हान दिले आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आता काय भूमिका घेणार?  हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

           धीरज पानसंबळ यांनी बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या काही काळात ना.प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे रेशन कार्ड, वृक्षारोपण, विविध रस्त्यांच्या दुरूस्तींचे  कामे, कोविड काळात निर्जंतुकीकरण फवारणी करणे आदी माध्यमातून जिल्हापरिषदेच्या निवडणुकीची तयारी केल्याचे बोलले जात होते.तर  दुसरीकडे देखील  जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य धनराज गाडे यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्या विकास निधीतून जनतेची कामे केले आहेत. त्यामुळे आता एकाच गटातून दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दावेदार झाल्याने राज्यमंत्री कोणाला आशीर्वाद देणार ? हे देखील ऐनवेळी समजणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत