राहुरी आश्रमशाळेत जागतिक योग दिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी आश्रमशाळेत जागतिक योग दिन साजरा

  राहुरी(वेबटीम) येथिल श्री.गाडगे महाराज आश्रमशाळेत १४ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपुर्ण वातावरणांत शाळेच्या मातोश्री सखुबाई हॉलमध्ये संप...

 राहुरी(वेबटीम)

येथिल श्री.गाडगे महाराज आश्रमशाळेत १४ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपुर्ण वातावरणांत शाळेच्या मातोश्री सखुबाई हॉलमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुदाम दिघे यांनी केले.             याप्रसंगी पतंजली योग समिती राहुरीचे सदस्य व पतंजली योगपिठातुन योग शिक्षक पदवी घेतलेले आमच्या शाळेतील शिक्षक श्री.अविनाश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके करण्यांत आली,यावेळी त्यांनी वेगवेगळ्या योगासनांचा शारीरीक व मानसिक होणारा फायदा सांगितला व नियमित योग साधना केल्याने आपण कोरोणा सारख्या जीवघेण्या आजारावर आपल्या शरीराची रोगाप्रतिकार शक्ती वाढवुन मात करु शकतो असे सांगितले.          


     याप्रसंगी प्राथ.मुख्याध्यापक श्री.गजानन खर्चे,पदविधर प्राथ.शिक्षिका श्रीमती मिनाक्षी लोखंडे,श्री.अंबादास उंडे,श्रीमती छाया लोंढे,श्रीमती निलीमा व्यवहारे,श्रीमती अंजनाबाई मोरे,अधिक्षक श्री.अजाबराव गोळे,अधिक्षिका श्रीमती आरती नानकदे,श्री.संजय सूर्यवंशी,श्री.नामदेव कोल्हे,श्री.शरद मिरगे,श्री.तानाजी मुठे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी माध्य.मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ सूर्यवंशी यांनी योगशिक्षक व सर्वांचे आभार मानले  यावेळी शाळेच्या उत्साही,कर्तव्यदक्ष,विद्यार्थी प्रिय पदविधर प्राथमिक शिक्षिका सौ.मिनाक्षी लोखंडे मॕडम यांचा वाढदिवस असल्याने त्यांनाही उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यांत आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत