बोगस सोयाबीन बियाणे तपासणी साठी भरारी पथक नेमावे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बोगस सोयाबीन बियाणे तपासणी साठी भरारी पथक नेमावे

कोपरगाव(वेबटीम) मागील वर्षी बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून या वर्षी अशी फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरा...

कोपरगाव(वेबटीम)

मागील वर्षी बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून या वर्षी अशी फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथक नेमावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस सोयाबीन बियाण्यांची  विक्री झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला आता देखील खरीप पूर्व मशागतीच्या कामाने वेग घेतला असून मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे चांगल्या प्रकारे उगवण झाले नाही तर त्या नंतर महाराष्ट्रात सर्व दूर झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन पीक सोंगणी करता आले नाही तर बरेच ठिकाणी सोयाबीन पावसा मुळे काळी पडली आहे तेलबिया पिकातील सोयाबीन हे मुख्य पीक असल्याने व मागील वर्षी नुकसान झाल्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले आहे .

 शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नाही मात्र या वर्षी अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळाले असून त्यामुळे बियाण्यांचा काळा बाजार होण्याची व चढ्या भावाने विक्री होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने बियाण्यांची उपलब्धता व विक्री या बाबत ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांची बोगस बियाणे खरेदीत फसवणूक होऊ नये. विनाकारण मेहनत मशागत करून मागील वर्षाप्रमाने शेतकऱ्यांचा खर्च वाया जाऊन नये व बोगस बियाण्यामुळे फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथक नेमणूक करावी व उपलब्ध बियाणे यांची गुणवत्ता, भाव या वर नियंत्रण ठेवावे करोना साथीच्या आजाराने आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यामुळे असे पथक नेमून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे या पत्रकात म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत