राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी कारखान्याच्या सुबत्तेच्या काळात उत्तम प्रकृती असलेल्या विवेकानंद नर्सिंग होमची तब्येत आता पूर्णपणे खालावली असू...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी कारखान्याच्या सुबत्तेच्या काळात उत्तम प्रकृती असलेल्या विवेकानंद नर्सिंग होमची तब्येत आता पूर्णपणे खालावली असून या विवेकानंद नर्सिंग होमला आता उपचारांची गरज आहे. काल नर्सिंग होमच्या अतिदक्षता विभागात एका तरुणीने फाशी घेऊन आत्महत्या केल्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला आहे. एकेकाळी नर्सिंग होमही परिसरासाठी वरदान ठरलेली अत्यंत उपयोगी व रुग्णांचा जीव वाचवणारी आस्थापना म्हणून परिसरात सर्वत्र नर्सिंग होमची चर्चा असायची. मात्र जशी कारखान्याची परिस्थिती कर्जबाजारी झाली तशी नर्सिंग होमची दुरवस्था होत गेली. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर नर्सिंग होममध्ये सुधारणा होऊन पुन्हा रुग्णांना वेळेत औषध उपचार होतील अशी अशा लोकांना होती परंतु ती पूर्णपणेफोल ठरली आहे.
*सभासद म्हणताय ही आहेत नर्सिंग होमची दुरावस्था होण्याची कारणे*
*व्यवस्थापनाचे सपशेल दुर्लक्ष
*रूग्ण सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रचंड उदासीनता.
*आरएमओ उपलब्धता नसणे.
*अधिकारी व कर्मचारी अंतर्गत मतभेद
*वेळेवर मासिक वेतन न होणे
* कर्मचारी व नर्स स्टाफ नेहमी मोबाईल मध्ये असतो दंग..
*रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्यानंतर डिस्चार्जवेळी राजकीय हस्तक्षेप होऊन बिलात सवलत तथा संपूर्ण बिलमाफीसाठीचा प्रयत्न
*प्रशासनाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांवर वचक पूर्णपणे नाहीसा झाल्याने संपूर्ण भोंगळा कारभार
*सामाजिक कार्यकर्त्याकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या तक्रारीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
*सीसीटीव्ही सर्वकाही दिसत असताना प्रशासनाकडून होणारा डोळेझाकपणा
* हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ डॉक्टरची गरज
*उपलब्ध असलेल्या डॉक्टराकडून रूग्ण व नातेवाईकास मिळणारी अशोभनीय वागणूक, बघू-पाहू अशी उडवाउडवीची उत्तरे
*अतिदक्षता विभाग असून आधुनिक तंत्राची कमतरता


कोणत्याही टिप्पण्या नाहीत