कर्जत पोलिसांनी दूध भेसळीसाठीची पॉवडर केली जप्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्जत पोलिसांनी दूध भेसळीसाठीची पॉवडर केली जप्त

कर्जत दिनांक 13/06/2021रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट...

कर्जत

दिनांक 13/06/2021रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे आणि ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार महादेव गाडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गणेश भागडे ,महिला होमगार्ड कल्पना घोडके यांना सांगून सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करा असे आदेशीत केल्याने वरील पोलीस स्टाफ तात्काळ पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने रवाना झाले. खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट कार क्रमांक mh 14 Bk2772 असलेली आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्यातील इसमाकडे त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे असिफ गफूर शेख, वय 22 वर्ष, 2) अरबाज हसन शेख, वय 22 वर्ष, दोन्ही रा मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. पोलीस स्टाफने सदर वाहनाची झडती घेतली असता गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरच्या 25 किलो वजनाच्या 8 गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत 3500 रुपये प्रमाणे 28,000 रु किमतीच्या असलेली दिसल्या. त्यावेळी पोलिसांनी वरील इसम यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी आमचे दूरगाव गावी चाललो होतो. त्यावेळी पोलिसांची खात्री झाली की सदरची पावडर ही दुधात भेसळ करण्यासाठी घेऊन जात होते असे कळवून त्यांचे घरी सदरबाबत कशी भेसळ केली जाते याबाबत प्रक्रिया करून दाखविली. पोलिसांनी वरील दोन इसम यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर न 694/2021 भा द वि कलम 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून कोर्टाचे परवानगीने पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते हे करीत आहेत. दूध पावडर आणि गाडी असा 4,28,000 रु चा माल जप्त करण्यात आला आहे..


सदरची कारवाई. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान शिरसाठ, सहायक फौजदार महादेव गाडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,  पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सुनील खैरे यांनी ,महिला होमगार्ड कल्पना घोडके यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत