कोपरगाव/प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ कोपरगावने अनेक सामाजिक उपक्रम राबवत व कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या...
कोपरगाव/प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ कोपरगावने अनेक सामाजिक उपक्रम राबवत व कोविड काळात समाजोपयोगी कामे करत समाजात अढळ स्थान निर्माण केलं आहे. यावर्षी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ५१ व्या वर्षात पदार्पण करत असून, २०२१-२२ या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी रामदास थोरे, उपाध्यक्षपदी परेश उदावंत, सेक्रेटरीपदी अक्षय गिरमे, खजिनदारपदी सुमित भट्टड आदिंची महत्वपूर्ण निवड झाल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे ज्येष्ठ संचालक तुलसीदास खुबाणी यांनी दिली.
लायन्स क्लबच्या माध्यमातून मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विशेष करून गरजवंतांना अन्नधान्य वाटप, डायलिसीस सेंटर अशा महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. तसेच जयपूर फुट कॅम्प, प्लास्टिक सर्जरी शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बिझनेस एक्स्पो अशा प्रकारचे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
अध्यक्षपदी निवड झालेले रामदास थोरे यांनी २०१७ साली लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे सेक्रेटरी म्हणून पद भूषवत असताना लायन्स क्लबचा ‘बेस्ट सेक्रेटरी’ या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तर २०१९-२० मध्ये लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे उपाध्यक्ष म्हणून पद भूषविले आहेत. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे या तिन्ही जिल्हे मिळून निघणाऱ्या ‘सह्याद्री लायन’ मासिकाचे ‘सहसंपादक’ म्हणून काम पाहत आहे. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान लायन्स क्लबला लाभले असून पुढेही फायदा व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.
या निवडीबद्दल लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत