कोपरगावचे पोलीस निरीक्षक देसले 'कोरोना योद्धा' पुरस्काराने सन्मानित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे पोलीस निरीक्षक देसले 'कोरोना योद्धा' पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव/प्रतिनिधी कोरोना महामारीमध्ये आरोग्य, पोलीस, महसूल व स्थानिक स्वराज्य संस्था पहिल्या फळीत काम करत आहे. यामध्ये नियमांची कडक अंमलबजाव...

कोपरगाव/प्रतिनिधी

कोरोना महामारीमध्ये आरोग्य, पोलीस, महसूल व स्थानिक स्वराज्य संस्था पहिल्या फळीत काम करत आहे. यामध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करून घेण्यासाठी पोलीस मुख्य भूमिका निभावत आहे. कोपरगावमध्येही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकताच त्यांना 'कोरोना योद्धा' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आमदार तथा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांना सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रांताधिकरी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका पोलीस निरीक्षक दौलत जाधव आदी उपस्थित होते. 


जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कोपरगाव दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, प्रशासनाने योग्य समन्वय ठेवत प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळविले आहे. यामध्ये आरोग्य विभागाबरोबर पोलीस, महसूल व पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. याबद्दल नागरिकांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत