नेवासा/वेबटीम :- अनेक भागात पूर्व मान्सूनच्यासरी चांगल्या कोसळत आहेत व मान्सूनचे आगमन होत आहे हवामानाचा अंदाज प्रमाणे प्रमाणे 98 टक्के ...
नेवासा/वेबटीम :-
अनेक भागात पूर्व मान्सूनच्यासरी चांगल्या कोसळत आहेत व मान्सूनचे आगमन होत आहे हवामानाचा अंदाज प्रमाणे प्रमाणे 98 टक्के टक्क्यांवरून 101 टक्के पाऊस होणार आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन करतानाबीबियाणे व नवीन वाण बीजप्रक्रिया रासायनिक खतांचा संतुलित बेसल मात्रा जिवाणू खतांचा वापर दोन ओळीतील स्वरुपातील आंतर लागवडीच्या पद्धती यांचा नियोजनासाठी अभ्यासपूर्वक विचार करावाखरीप हंगामात शेतकरी लाल कांदा घेतात त्यासाठीएन 53 व बसवंत 780 तसेच फुले समर्थआणिअर्का कल्याण या या जातींचा वापर करावा कांद्याची लागवड पेरणी करूनही करता येते त्याचा अवलंब करावाअझोस्पिरिलम या जिवाणू खतांचा वापर करूनयुरियाची एकगोणी सुपर फॉस्फेट अडीच गोण्या पोटॅश एकगोणी वापरावीकपाशी बाबत बोंड अळीच्या नियंत्रणासाठी मे मध्ये लागवड करण्यात येऊ नये असा सल्ला होता तरी आता जूनमध्ये कपाशीची लागवड बागायती क्षेत्रात करण्यास हरकत नाही त्यासाठीधन देव राशी659 या जातीचा वापर करावा लागवडीच्या वेळी मॅग्नेशियम सल्फेटइतर खताबरोबर द्यावे म्हणजे लाल्याचा प्रादुर्भाव होणार नाही सोयाबीनच्या 93शून्य पाच तसेच फुले संगम या जातीचा वापर करावा रासायनिक खते वापरताना माती परीक्षणाच्या अहवालाचा उपयोग करावा सोयाबीनलाएक बॅग डीएपी एकराला द्यावी मका ग्लोबल पिक आहे गरज आंतरराष्ट्रीय पातळीवर बरोबर भारतात सुद्धा वाढणार आहे त्यामुळे भावाचे स्थिरीकरण होईल त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने काही क्षेत्रावर भरगच्च भरलेल्यातीन कणसे असलेली जात वापरावी
तुर पिकासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची राजेश्वरी खडका वर्जिन या जातींचा वापर करावा खतांचे नियोजनामध्ये जिवाणू खते वापरणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या जमिनीत जिवाणूंची संख्या कमी झालेली आढळते आपण दिलेलीसेंद्रिय खते कुजविण्यासाठी व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी जिवाणू खते प्रत्येक पिकास प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावे जिवाणू खते कमी खर्चाची स्वस्त व हाताळण्यास सोपी आहेत खरीप हंगामाची सुरुवात झाल्यामुळे शेतकरी बंधुंनी हा कानमंत्र वापरावा असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक राव ढगे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत