रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी पगारे यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी पगारे यांची निवड

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब शंकर पगारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी नि...



देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब शंकर पगारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकब निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली आज चेंबूर येथे पार पडलेल्या  बैठकीत पगारे यांना दीपक निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रसंगी उत्तर अमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी राजन अशोक ब्राम्हणे, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष पदी दिपक बळीराम  सपकाळे,व  जळगाव जिल्हा सचिव यशवंत अमृत  बईसाने यांची नियुक्ती करण्यात आली.


 यावेळी राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील,कर्मवीर राष्ट्रीय संघटक  सुनीलभाऊ खांबे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार , महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण महाराष्ट्र सचिव अशोक संस्थाने तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे , उत्तर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष रॉकी लोंढे यांच्यासह विशाल परदेशी,किरण दारोळे, निखिल खरात, निसारभाई पठाण, संदेश लोंढे तसेच अहमदनगर जिल्हा व जळगाव जिल्हा मधील कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत