अहमदनगर (वेबटीम) गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस कर्मचाऱ्याने फायनान्स बँकेत तारण ठेऊन त्यावर कर्ज काढुन 5 लाख 46 हजार 640 रूपये स्वत:...
अहमदनगर (वेबटीम)
गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस कर्मचाऱ्याने फायनान्स बँकेत तारण ठेऊन त्यावर कर्ज काढुन 5 लाख 46 हजार 640 रूपये स्वत:च्या फायद्यासाठी खर्च केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नगर तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेला पोलीस नाईक गणेश नामदेव शिंदे याने गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा अपहार केला. सदर अपहार केलेला मुद्देमाल पोलीस कर्मचाऱ्याने फायनान्स बँकेत तारण ठेऊन त्यावर कर्ज काढुन 5 लाख 46 हजार 640 रूपये स्वत:च्या फायद्यासाठी खर्च केले
तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत