सात्रळ ग्रामपंचायत हद्दीतील पारिजातक गल्लीतील रस्त्याचे कॉक्रेंटीकरण कामाचे शुभारंभ विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू ...
सात्रळ ग्रामपंचायत हद्दीतील पारिजातक गल्लीतील रस्त्याचे कॉक्रेंटीकरण कामाचे शुभारंभ विखे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
१५ व्या वित्त आयोगाचा निधीतून ७ लाख १९ हजार रुपयांचे हे काम असून त्यात खडीकरण, मुरुमीकरण व कॉंक्रेटीकरण असे काम आहे. ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यापासून गावाच्या हद्दीतील आणखी रस्त्यांचे मजबुतीकरण, भूमिगत गटार योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रसंगी जेष्ठ सदस्य रमेश पन्हाळे व सरपंच सतिष ताठे यांनी परिसराची पाहणी करून लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावाची जास्तीजास्त सुधारणा करण्याचे अश्स्वासन देऊन ग्रामस्थांच्या सहकार्यांची अपेक्षाकरण्याचे आवाहन केले.
रस्ता कॉंक्रेटीकरण शुभारंभाच्या प्रसंगी ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य रमेशराव पन्हाळे, सरपंच सतिष ताठे, उपसरपंच तांबोळी, डॉ. पडघलमल, अजित जोर्वेकर, संदीप रोकडे, नंदुशेट पन्हाळे, सलीमभाई तांबोळी, अशोक पडघलमल, ज्ञानदेव डुकरे, रवी शेजवळ, संजय पडघलमल, पत्रकार अनिल वाकचौरे, पत्रकार सुकदेव डुकरे, तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत