ना.तनपुरे-मुरकुटे भेटीला 'मुळा प्रवरा' ची झालर ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना.तनपुरे-मुरकुटे भेटीला 'मुळा प्रवरा' ची झालर !

श्रीरामपूरची दि मुळा प्रवरा सहकारी वीज संस्था उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूडाच्या राजकारणात ...



श्रीरामपूरची दि मुळा प्रवरा सहकारी वीज संस्था उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूडाच्या राजकारणात बळी गेली. त्यात संस्थेचा वीज वितरण परवाना गेला असला तरी अस्तित्व मात्र कायम राहीले. परंतु, त्यानंतरही विखेनी संस्थेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले. आता राज्यात आघाडीचे सरकार आहे, उपमुख्यमंत्री पुन्हा अजित पवार आहेत तर ऊर्जाखातेही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे विखेंची कोंडी करण्यासाठी मुळा प्रवरा त्यांच्या ताब्यातून काढून घेण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या भेटीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. ही भेट अजित पवार यांच्या सूचनेवरून झाली असून, त्यात मुळा प्रवरा ताब्यात घेण्याबाबत माजी आमदार मुरकुटे यांच्यावर विशेष जबाबदारी दिली असल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे.                    

             श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा आदी तालुक्यात मुळा प्रवरा सहकारी वीज संस्था वीज पुरवठा करत होती. मात्र स्थानिक राजकारणात राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास  मुरकुटे यांच्यातील वितुष्ट राज्यात गाजले. त्यात मुरकुटे यांच्यामागे अजित पवार खंबीरपणे उभे राहिले, त्यांना ताकद दिली, त्यातून विखेना डोळ्यासमोर ठेवून मुळा प्रवरा वीज संस्थेचा परवाना काढून घेतला, अशी चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही रंगली होती, त्यानंतर विखेनेही आपल्या खात्याचे वजन वापरुन अजित पवारांच्या ताब्यातील काही संस्थांची चौकशी लावली होती. आशा प्रकारे विखे-पवार संघर्ष सुरू झाला होता, यात मुळा प्रवरा ही चांगली संस्था गेली, त्यानंतर महावितरणने ताबा घेतला, मुळा प्रवरेच्या मालमत्ता वापरापोटी  दरमहिन्याला कोट्यवधींचे भाडे मिळू लागले, त्यामुळे संस्था बंद असली तरी तिच्याकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिले जाऊ लागले. बंद संस्थेची निवडणूक झाली, त्यात विखे गटाने आपली पकड कधीही ढिली होऊ दिली नाही, गेल्या निवडणुकीतही सुजय विखे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र काही संघटनांनी उमेदवार देऊन निवडणूक घेण्यास भाग पाडले, त्यात विखे गटाने बाजी मारली, आता ऑगस्ट नंतर या संस्थेची निवडणूक लागणार आहे, आजची परिस्थिती वेगळी आहे, राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढली आहे, राज्यातही सरकार आहे, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ऊर्जा खाते आहे, माजी आमदार मुरकुटे हे देखील जिल्हा बँकेपासून चांगलेच सक्रिय आहेत, त्यामुळे जी मुळा प्रवरा संस्था आपल्या काळात चांगली सुरू होती, ती पुनर्जीवित करण्याची मुरकुटे यांची  इच्छा आहे,  तर ना.तनपुरे यांनाही आपल्या वाडवडिलांनी उभी केलेली ही संस्था पुन्हा अस्तित्वात आणून इतिहास घडविण्याची संधी आहे. या पार्श्वभूमीवर काही गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यातील ना. तनपुरे-मुरकुटे गुप्तगु महत्वाची समजलो जात आहे.  या भेटीतील चर्चा जरी गोपनीय असली तरी आगामी मुळा प्रवरा वीज संस्था ताकदीने लढवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठीच्या मायक्रो प्लॅनची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, या सर्व लढ्यात संगमनेरची पडद्याआडूनची भूमिका महत्वपूर्ण ठरणारी आहे. त्यामुळे मुळा प्रवरा वीज संस्थेच्या निवडणुकीसाठी विखे विरोधात मुरकुटे, आदिक, तनपुरे, ससाणे हे सर्व एकत्र आलेले दिसू शकतात, म्हणूनच या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.


 मात्र, विखे यांचा निवडणूक जिंकण्यात हातखंडा आहे, ते कुणाला सोबत घेतील आणि कुणाला सोडतील, हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच डॉ सुजय विखे यांनी देखील झालं गेलं विसरून मुरकुटे यांची भेट घेतली होती, अर्थात या भेटीमागेही मुळा प्रवरेचा अडसर दूर करण्याचा हेतू असल्याचे लपून राहिले नव्हते, शिवाय विखेनी मुरकुटेसह करणं ससाणे यांना जिल्हा बँकेत बिनविरोध पाठवनियास अप्रत्यक्ष मदत केली आहे, तिकडे अरुण तनपुरे यांनाही मदत करून तनपुरे घराण्यावर पुन्हा एक राजकीय कर्ज केले आहे, त्यामुळे विखेना सुरू असलेला हा गुप्त विरोध कितपत टिकेल, याबाबत सशनकता आहे. 

आगामी काळात हे सर्व नेते संस्थेचया अस्तित्वासाठी स्वातंत्रपणे निवडणुकीत उतरणार की आपल्या सोयीच्या राजकारणासाठी विखेच्या मांडवात उभे राहून आपले राजकीय कर्जाची इमानदारीने परतफेड करणार, हे लवकरच जनतेला पहायला मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत