कोपरगाव - अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागांतर्गत येणाऱ्या कोपरगाव तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल पदे नव्याने रुजू झालेल्या श्रीमती के सोनवणे य...
कोपरगाव -
अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागांतर्गत येणाऱ्या कोपरगाव तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल पदे नव्याने रुजू झालेल्या श्रीमती के सोनवणे यांचा ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी शाल पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे वन परिमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती सोनवणे यांची पदोन्नतीवर कोपरगाव येथे वनक्षेत्रपाल या पदावर बदली झाली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारत आपले काम देखील सुरु केले आहे.
शुक्रवार दिनांक २ जुलै २०२१ रोजी श्रीमती सोनवणे यांनी कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी श्रीमती सोनवणे यांचा सत्कार केला.
यावेळी वनविभागाचे कर्मचारी भाऊसाहेब कुळधरण तसेच बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा विजय कापसे, रेखा दिवे आदी उपस्थित होते.
या वेळी श्रीमती सोनवणे यांनी संस्थेत सुरू असलेल्या शासन मान्य अभ्यासक्रमाची माहिती घेत संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत संस्थेस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत