सात्रळ सात्रळ -सोनगाव- धानोरे पंचक्रोशीतुन तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या तांभेरे रस्त्याची जागोजागी असलेले खड्डे, तुटलेल...
सात्रळ
सात्रळ -सोनगाव- धानोरे पंचक्रोशीतुन तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या तांभेरे रस्त्याची जागोजागी असलेले खड्डे, तुटलेल्या साईड कपारी, साईड पट्टयात मुरूम न भरल्याने झालेले खड्डे, रस्त्याचे बाजूवरील अतिक्रमण यामुळे दयनिय अवस्था झाली आहे.
या रस्त्याने वाहनधारकांना प्रवास करायचा म्हणजे एक दिव्य पार पडणे असे असून या मुळे अपघातास निमंत्रण होत आहे. अनेक दुचाकी चालक यात घसरून पडल्याचे चित्र वेळोवेळी वेळी पाहावयास मिळत असून लोकप्रतिनिधींचे तसेच संबंधीत विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. नगर -मनमाड महामार्गावरील कोल्हार पुलावरील वाहतूक जाम झाल्यावर याच रस्त्याने वाहतूक वळवली जात असून या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्ता पूर्णपणे जागोजागी झालेला असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती तसेच रुंदीकरणाची मागणी स्थानिकांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत