राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या विरोधात नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर होणा-या उपोषणा...
राहुरी तालुक्यातील खडांबे येथे काही दिवसापूर्वी दोन समाजात तेढ निर्माण होणारी घटना घडली होती याबाबत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे मात्र याच घटनेबाबद पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांची खातेनिहाय चौकशी करूण निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व आरपीआय च्या दोन कार्यकर्तांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन दिले असुन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र आता याच उपोषणास आरपीआय चा कोणीही नावाचा वापर करून बदनामी करू नये यासाठी सचिन साळवे यांनी पोलिसांना निवेदन दिल्याने संघटनेतील अंतर्गत कलह समोर आला आहे.दलित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी रिपाई आणि वंचित बहुजन आघाडीच्या दोन कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक दुधाळ यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे मात्र सदर आरोपी विरोधात कारवाई देखील करण्यात आली आहे तरी देखील पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी का ? असा प्रश्न उपस्थित झालाय तर या दोनही संघटनेने याबाबत हात झटकले असून हे उपोषण खरंच दलित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, की पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यावर काही वयक्तीक कारणातुन आहे या बाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहेत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत