राहुरी पोलिसांच्या कैदी मध्ये असलेल्या आरोपींना लसीकरण करण्याचा अनोखा उपक्रम राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख यांनी राबवला असून राहुरी...
राहुरी
पोलिसांच्या कैदी मध्ये असलेल्या आरोपींना लसीकरण करण्याचा अनोखा उपक्रम राहुरीचे तहसीलदार एफ आर शेख यांनी राबवला असून राहुरी पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या सुमारे 19 कैद्यांचे लसीकरण आज करण्यात आलेले आहे. राज्यातील बहुदा हा पहिल्यांदा राबवला गेलेला उपक्रम आसावा.
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर राहुरी चे तहसीलदार एफ आर शेख यांनी जेल मध्ये असणाऱ्या कैद्यांचे लसीकरण करण्या संदर्भामध्ये उपक्रम हाती घेतला होता त्यानुसार आज मंगळवार दिनांक 13 जुलै रोजी राहुरी च्या जेल मध्ये असणाऱ्या कायद्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे यामध्ये 18 पुरुष कैदी व एक महिला कायद्याला कोरोना महामारी पासून बचाव होणारी लस देण्यात आलेली आहे. यावेळी राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, आरोग्य सहाय्यक सुनील पाथरकर, प्रकाश तमनर ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वर इघे, शाहरुख शेख आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते तर नर्स हेमलता राजनुर यांनी संबंधित कायद्यांचे लसीकरण केले. तहसीलदार एफ.आर.शेख यांनी या लसीकरणासाठी पुढाकार घेतला होता महाराष्ट्र मधील हा अशाप्रकारे राबवण्यात आलेला पहिलाच उपक्रम असावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत