राहुरी फॅक्टरी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गण...
राहुरी फॅक्टरी
येथील नूतन माध्यमिक विद्यालयात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.
यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश शेठ वाबळे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे,ज्येष्ठ नेते गुलाबराव कदम,पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सुरेश निमसे,नगरसेवक आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, बाळासाहेब खुरुद आदींसह साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, बाळासाहेब कदम, आर. पी.आय. (आंबेडकर गट) दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे,राहुरी अर्बन चेअरमन रामभाऊ काळे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णू गीते किशोर थोरात ललित चोरडिय, आबासाहेब वाळुंज भाऊसाहेब गुंजाळ मकरंद गोलांडे, शरीफ शेख, समीर शेख , श्रीकांत मेळवणे, संतोष नहार ,काशिनाथ रसाळ ,खेडकर सर ,राहुरी महाविद्यालयाचे जगदाळे सर, शरद वाळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक तेवढं पाण्याच्या टँकरचे बघा
वृक्षारोपण झाल्यानंतर प्रसाद तनपुरे यांनी राहुरी फँक्टरी परीसरातील नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्याकडे बघत वृक्षारोपण ठिकाणी पाण्याचा टँकर तातडीने बोलवा अशी सूचना दिली.नगरसेवक वाणी यांनी आपल्याला पालिकेत कोणताच अधिकार नाही. हे माहित असल्याने. सहकारी नगरसेवक आदिनाथ कराळे यांना पुढे घेऊन आम्ही टॅंकर पुरवतो असे उत्तर दिले. दरम्यान देवळाली नगरपालिकेत गेल्या साडे चार वर्षात सत्ताधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांशीवाय कोणत्याही नगरसेवकास कुठलेही अधिकार नसल्याचे तनपुरे यांना पूर्णपणे माहिती असल्यामुळेच प्रसाद तनपुरे यांनी त्यांना मानणाऱ्या वाणी यांची फिरकी घेत पाच वर्षात किती अधिकार मिळाले याची जाणीव करुन दिल्याची चर्चा सुरू होती.
'त्या' चार नगरसेवकांची उपस्थिती
देवळाली नगरपालिका सन २०16 च्या निवडणुकित प्रसाद तनपुरे यांनी आपल्या जवळच्या मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये पाठविले. कदम व तनपुरे यांच्यात राजकीय सेंटलमेंट झाली. त्यामुळे तनपुरे यांना मानणारे सचिन ढुस, अण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद, संजय बर्डे, ज्ञानेश्वर वाणी त्यांना भाजपची उमेदवारी मिळवून देत निवडणूकीत मदत केली व त्यांना निवडुनही आणले.मात्र नगर पालिकेची एक हाथी सत्ता मिळाल्या नंतर सत्ताधारी यांनी प्रकाश संसारे, सचिन ढुस या प्रमुख पदाधिकारी यांना हाताला धरुन 'एकला चलो रे' भूमिका घेऊन इतर कोणत्याही नगरसेवकास विशेष स्थान अथवा अधिकार दिले नाही. साडेचार वर्षे इतर नगरसेवकांना "धरंल तर चावतय, सोडल तर पळतंय" अशी अवस्था झाल्याने एकमेकांत पस्तावा व्यक्त करत राहिले.दरम्यान आगामी काही महिन्यांवर नगरपालिका निवडणुक असून राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असून चोथे, कराळे, वाणी, खुरुद, बर्डे आदी विद्यमान नगरसेवक हे राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झाले आहे.परंतु केवळ औपचारिकता बाकी आहे. आज तनपुरे यांच्या वाढदिवसाला त्यांची उपस्थिती सर्व काही सांगून जात होती. नगरसेवक सचिन ढुस मात्र दिसून आले नाही. त्यांची सध्या द्विधा मनस्थिती आहे. मात्र राष्ट्रवादीची देवळालीत बॉसिंंगगिरी दिली तर ढुस हे राष्ट्रवादीत दिसतील असे बोलले जात आहे. परंतू राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते व नगरसेवक मंडळी ढुस यांना उघडपणे विरोध करणार असल्याचे नगरसेवकांच्या चर्चेतून समजते.
उद्योग व बँकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची कार्यक्रमास हजेरी
प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्तीय तथा उद्योजक गणेश भांड यांच्यासह बँकिंग,व्यवसाय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते. तनपुरे यांनी या सर्वांची केलेली आस्थेने विचारपूस करत गप्पा मारल्या. येत्या नगरपालिका निवडणूकित प्रसाद तनपुरे हे जुन्या-नव्या कार्यकर्त्यांंचा मेळ घालुन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने नगरपालिका निवडणुकीला सामोरे जावून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत