मुळा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी खास...
मुळा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली आहे.
मानोरी येथील बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे 25 लाख 25 हजार तर डिग्रस येथील बंधाऱ्यात नऊ लाख 55 हजार रुपये खर्चास मान्यता मिळालेली आहे मुळा नदी पात्रात डिग्रस मानोरी मांजरी वांजुळपोई अशी बंधाऱ्यांची मालिका आहे ही सर्व बंधारे मोठ्या प्रयत्नाने उभारण्यात आली. यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना शेती साठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा उपयोग होतो मध्यंतरी अतिवृष्टी व आधिकच्या पाण्यामुळे बंधारे नादुरुस्त झालेले होते दुरुस्तीसाठी निधी मिळणे अत्यंत गरजेचे होते .
या आधीच्या शासनाने बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही मदत केली नाही दुरुस्तीसाठी निघालेल्या निविदाही रद्द केलेल्या होत्या सन 1999 सालापासून बंधारे बांधण्यात आलेले होते. या सर्व बंधाऱ्यात जवळपास एक हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा होतो पुनर्भरण व वापर यामुळे दोन टीएमसी पाण्याचे गणित होते मानोरी बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता 125 दशलक्ष घनफूट असून या बंधाऱ्यामुळे केंदळ खूर्द ,मानोरी ,आरडगाव, केंदळ बुद्रुक या गावातील सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येते सन 2006 सली अतिवृष्टीमुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते सुमारे 52 हजार क्यूसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग नदीत नदीतून जात होताे बंधाऱ्याच्या दोन्ही तिरावरील भराव व पिचिंग वाहून गेले होते त्यामुळे धोका निर्माण झाला होता. बंधारे दुरुस्ती बंधारे दुरुस्ती करण्यासाठी लागणारा निधी त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे या हंगामातील नदी द्वारे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी आडवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत