गणेगाव येथील जमिनीच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव येथील जमिनीच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या

   राहुरी येथील  पत्रकार   रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसम...

  

राहुरी येथील  पत्रकार   रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no. 286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास Dysp संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

Dysp मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असले बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने  त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. व त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात  जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी     मिळवून  सदर गुन्ह्याचा  सखोल तपास केला. यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता.  बीनंदनकी  जिल्हा  फत्तेपूर  उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु  सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे वाढवून  न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी  तथा श्रीरामपूर विभागाचे Dy.s.p. संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु मोरे याचे सह चार आरोपी विरोधात दोषारोप पत्र आज रोजी न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

   *असा घडला घटनाक्रम*

     दि. 06/04/2021 पत्रकार रोहिदास दातीरयांचे अपहरण व हत्येबाबत  363,302 प्रमाणे गुन्हा  दाखल

     दि. 07/04/2021  कान्हु मोरे व साथीदारांनी    गुन्हा केल्याचे उघड

    दि. 08/04/2021 अर्जुन विक्रम माळी व तोफिक   मुक्तार शेख यास  अटक

   दि. 18/04/2021 ... कान्हु गंगाराम मोरे यास    नेवासा   फाटा येथून अटक

 दि. 27/04/2021अक्षय कुलथे यास  उत्तरप्रदेश  येथून अटक 

 दि. 11/06/2021 व्यापारी अनिल गावडे यास सहआरोपी           दि 06/07/2021रोजी आरोपी कान्हु मोरे याचेसह अन्य 4 आरोपींविरोधात  दोषारोप पत्र 

*प्रेत राहुरीत आणून टाकण्याचे कारण*....

पत्रकार रोहिदास दातिर यांना जिवे ठार मारून प्रेत राहुरित आणून टाकण्याचा उद्देश नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होउन दहशत निर्माण करणे म्हणणे भविष्यात कोणीही नादी लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत