राहुरी फॅक्टरी येथील नवविवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील नवविवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू

 राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पासून काही अंतरावर राहत असलेल्या तरुणाचा  सुपा परिसरात (ता.पारनेर) येथे अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सायं...



 राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर पासून काही अंतरावर राहत असलेल्या तरुणाचा  सुपा परिसरात (ता.पारनेर) येथे अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी  घडली आहे.



 प्रसादनगर भागातील रहिवासी वाहिद पठाण या तरुणाचा 28 जून रोजी विवाह संपन्न झाला होता. वाहिद हा सुपा येथे आपल्या सासुरवाडीला पत्नी शाजिया हिस आणण्यासाठी गेला असता सायंकाळी राहुरी फॅक्टरी येथे आपल्या घरी परतत असताना सुपा- नगर मार्गावर त्यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. यात वाहिद पठाण हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तर पत्नी, चालक जखमी असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

वाहिद याच्या मृत्यूची बातमी समजताच मित्र परिवाराने सोशल मीडियावर श्रध्दांजली पोस्ट टाकून दुःख व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.

लवकरच सविस्तर बातमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत