कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरात विजेचा तारा चोरून नेणाऱ्यास कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाणे...
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरात विजेचा तारा चोरून नेणाऱ्यास कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. १४ जुलै २०२१ रोजी रात्री चे सुमारास संवत्सर शिवारातील गणपती तळ्याचे परिसरात अज्ञात चोरट्याने विजेच्या पोलवरील विद्युत वाहक तारा चोरुन नेलेबाबत शहर पोस्टेस गुर.नं. २२१/२०२१ भा.वि का.क. १३६ प्रमाणे दाखल झाला होता. दि. १६ जुलै २०२१ रोजी पो.ना.ए. एम. दारकुंडे, पो.कॉ. गणेश मैड, पो.कॉ. बी.बी. धोंगडे पेट्रोलींग करत असताना संशयावरुन तसेच गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील अशोक उर्फ मुकेश उत्तम बोर्डे यास ताब्यात घेवुन त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करुन सदरचा गुन्हा करताना त्यास असलेले साथीदारांबाबत विचारपुस केली असता.
त्याने त्यास गुन्हा करताना भारत मच्छिंद्र वन्से रा लोणी ता. वैजापुर , शिवा निवृत्ती गायकवाड रा. हिलालपुर ता. वैजापुर असे साथीदार असल्याचे सांगितले.
यातील शिवा गायकवाड यास पोलिसांनी त्याचे राहते घरुन ताब्यात घेवुन त्याचा कडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करत ३५,०००/- रु किमतीची ७२० मीटर लांबी असलेली व ३४ स्क्वेअर जाडीची अल्युमिनीअमची वीज वाहक तार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे याचे सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधीकारी संजय सातव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्नाखाली सहायक पोलिस निरीक्षक भरत नागरे, पो.ना.अर्जुन दारकुंडे, पो.कॉ. गणेश मैड, पो.कॉ. बी.बी. धोंगडे म.पो.कॉ. बनकर यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत