राहुरी येथील श्री.गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ वि.सूर्यवंशी हे ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० जुन रोजी सेवानिवृ...
राहुरी येथील श्री.गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ वि.सूर्यवंशी हे ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० जुन रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम शाखेच्या संचालिका सौ.भारतीताई खिलारी यांचे अध्यक्षतेखाली शाळेच्या मातोश्री सखुबाई हॉलमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अविनाश इंगळे यांनी तर सूत्रसंचलन श्री.सुदाम दिघे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा,सत्कारमुर्ती सूर्यवंशी सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वंदना सूर्यवंशी व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते कर्मयोगी संत श्री.गाडगे महाराज,संस्थेचे माजी उपाध्यक्ष,दलितमित्र स्व.तुकाराम खांडवे आण्णा,स्व.मिराताई खांडवे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यांत आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे,नगराध्यक्ष श्री.अनिलशेठ कासार,श्री.गोवर्धन माळी,श्रीमती छाया लोंढे,अधिक्षक श्री.अजाबराव गोळे,सेवानिवृत्त शिक्षक श्री.हनुमंतराव आवटे,श्री.देविदास तांदळे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.खिलारी यांनी श्री.सूर्यवंशी यांच्या कार्याचे,शैक्षणिक योगदानाचे,व त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन निवृत्तीनंतरच्या काळासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.यावेळी सत्कारमुर्ती श्री.सूर्यवंशी यांनी त्यांच्या संस्थेतील प्रवेशापासुन सेवानिवृत्त होईपर्यंतचे अनुभव,कुटुंब,नातेवाईक व इतर सहका-यांपासुन आलेले अनुभव,सहकार्य कथन करुन सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मा.संचालिका, शाळेतील सर्व कर्मचारी यांनी व भानसहिवरे येथिल संचालक श्री.गणेश खांडवे,व सौ.सुवर्णा खांडवे तसेच श्री.भाऊसाहेब गुलदगड यांनी त्यांचा ड्रेस व सौ.सूर्यवंशी यांना साडी व शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी श्री.सूर्यवंशी यांचा सत्कार राहुरी नगरपालीकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे,विद्यमान नगराध्यक्ष श्री.अनिलशेठ कासार,माजी नगराध्यक्ष श्री.दिलीपभाऊ चौधरी,मा.उपनगराध्यक्ष श्री.सूर्यकांत भुजाडी,श्री.गाडगे महाराज मिशन,मुंबईचे खजिनदार व वळण शाखेचे संचालक श्री.अशोकराव पाटील,राहुरी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी श्री.सुनिल सूर्यवंशी,विस्तार अधिकारी श्री.अंबादास गारुडकर,माध्य.मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.निवृत्ती इले,राहुरी मुख्याध्यापक संघाचे श्री.मंगेश पगारे,श्री.दादासाहेब कुलट,श्री.कैलास अनाप,श्री.मगर सर, राहुरी तालुका गणित-विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री.सुहास महाजन,महाराष्ट्र संपादक व पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र वाडेकर,सा.विचारमंचचे संपादक श्री.रमेशराव बोरुडे,दै.प्रभात चे पत्रकार श्री.अशोकराव मंडलीक,पत्रकार श्री.जाधव,मानवाधिकार आयोगाच्या पुणे जिल्हाध्यक्ष श्रीमती माधुरी उदावंत, प्रहार तालुका अपंग संघटनेचे अध्यक्ष श्री.मधुकरराव घाडगे,श्री.योगेश लबडे,अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे तालुका अध्यक्ष श्री.अरुण तुपविहीरे,
केशर गृपचे श्री.शिवाजीकाका तनपुरे,श्री.गायकवाड साहेब,बामसेफ व भारत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष डॉ.गायकवाड श्री.सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन गुलदगड,सचिव श्री.सुनिल गुलदगड,सावता माळी संघाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोकराव तुपे,प्रसिध्दी प्रमुख श्री.दिपकराव साखरे,सल्लागार श्री.अजिंक्य मेहेत्रे,इंजि.स्वप्निल भास्कर व सावता माळी युवक संघाचे असंख्य कार्यकर्ते यांनी श्री.सूर्यवंशी यांचे सेवानिवृत्ती निमित्त शाळेत वृक्षारोपन केले व उपस्थितांना सॕनिटायझरचे वाटप करण्यांत आले.यावेळी नातेवाईक,विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,मित्र परीवार यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.शेवटी श्री.किरण पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत