उंबरेत दलित वस्तीतील 'तो' रस्ता सापडेना ; जिल्हा परिषदेमार्फत होणार चौकशी ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेत दलित वस्तीतील 'तो' रस्ता सापडेना ; जिल्हा परिषदेमार्फत होणार चौकशी ?

 उंबरे : प्रतिनिधी     उंबरे गावात दलित वस्तीसाठी शासनाने देऊ केलेल्या निधीचा काही तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी  पदाचा गैरवापर करून अन्यत्र वापर ...

 उंबरे : प्रतिनिधी


   

उंबरे गावात दलित वस्तीसाठी शासनाने देऊ केलेल्या निधीचा काही तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी  पदाचा गैरवापर करून अन्यत्र वापर केला आहे. त्यामुळे या प्रकरणी 15 दिवसात चौकशी करावी व दोषी लोकांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा पंचायत समिती आवारात आंदोलन करणार असल्याचा इशारा सेनेचे तालुका उपप्रमुख दीपक पंडित यांच्यासह  दलित बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.    शासनाने दलित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. मात्र, दलित वस्तीत काम करण्यापेक्षा  सोयीच्या राजकारणासाठी तसेच मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी काही पदाधिकारी कागदावर दलित वस्ती अन्यत्र दाखवून ते काम वेगळ्या ठिकाणी करतात. दलित बांधवांचा काम करण्यास विरोध नाही, मात्र हे काम जर कुणाचा हक्काचा निधी पळवून होत असेल तर उपयोग नाही, हा अन्याय आहे, शिवाय यात स्वार्थ देखील आहे.                                               उंबरे गावात गेल्या पाच वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बॉडीतील काही लोकांनी दलित वस्तीतील रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी अन्य ठिकाणी पळवला आहे.  मात्र, कागदावर दलित वस्तीत अंदाजे साडेसहा लाखांचा एक रस्ता पूर्ण झाल्याचा अहवाल देत त्याचे बिल देखील काढलेले उजेडात आले आहे,  पंडित आणि इतर दलित तरुणांनी नेमका हा रस्ता कोणत्या दलित वस्तीत झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, माळवाडी, तसेच गावठाण भागातही रस्ता सापडला नाही, त्यामुळे नेमका हा रस्ता कोणत्या दलित वस्तीत झाला, याबाबत चौकशी करावी, तसेच यात दोषी आढळणाऱ्या तत्कालीन पदाधिकाऱ्यासह ग्रामसेवकवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पंडित यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे केली आहे. यावेळी प्रदीप पंडित, संजय पंडित, राहुल गायकवाड, विजय पंडित, अशोक पंडित, सागर गायकवाड आदींच्या सह्यांचे निवेदन दिले आहे.  दरम्यान, यावेळी काही ग्रामपंचायत सदस्य तसेच दलित बांधब उपस्थित होते.  यावेळी क्षीरसागर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दलित निधी वापरात खरोखरच काही गोंधळ झाला असेल तर नक्किच कारवाई होईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत