अहमदनगर ग्रामीण पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाउपाध्यक्ष पदी सुनिल भोंगळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर ग्रामीण पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाउपाध्यक्ष पदी सुनिल भोंगळ

  अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाउपाध्यक्ष पदी सुनिल भोंगळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र ...


 

अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाउपाध्यक्ष पदी सुनिल भोंगळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी सुनिल भोंगळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे  मार्गदर्शक विलास कुलकर्णी,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव,नगर शहर प्रमुख भारत पवार,राहुरी तालुका अध्यक्ष गोविंद फुणगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष नवगिरे म्हणाले की, सुनिल भोंगळ यांनी विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये काम करून राहुरी तालुक्याचेच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्याचे नाव लौकिक वाढवला आहे. अनेक प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे की, ग्रामीण भागातील युवकांनी कष्ट केले तर नक्कीच इच्छित ध्येय ते गाठू शकतात. सध्या सुनिल भोंगळ हे न्यूज 1 इंडिया या राष्ट्रीय वृत्तवाहिनीत अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या पत्रकारितेतून नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात याही पुढे ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून ते पत्रकार बांधव तसेच सर्वसामान्यांना न्याय देतील अशा आम्हाला विश्वास आहे.

दरम्यान यावेळी बोलताना नवनियुक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाउपाध्यक्ष सुनिल भोंगळ यांनी संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी भरीव काम करणार असल्याचा मानस व्यक्त केला. ग्रामीण भागातील होतकरू युवा पत्रकारांना या धावपळीच्या युगात स्पर्धा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा युवा पत्रकारांसाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सुनिल भोंगळ यांनी यावेळी बोलून दाखवले.

सुनिल भोंगळ यांच्या नियुक्तीबाबत त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत