कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आज अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नवीन पोलीस वाहन दाखल झाले आहे. जुन्या वाहनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे ल...
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आज अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नवीन पोलीस वाहन दाखल झाले आहे.
जुन्या वाहनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असत त्याचा परिणाम तपासा कामी बाहेर जातांना किंवा रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करताना या जुन्या वाहनामुळे अनेक अडचणी येत असत तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची हद्द कोपरगाव शहरासह शहराच्या आजूबाजूला असणारे काही गावांचा ही यामध्ये समावेश असल्यामुळे गाडी अभावी अडचणी येत असत अखेर प्रतीक्षा संपली असून नवीन गाडी आल्यामुळे आता सर्वच कामे जलद गतीने होत होती मात्र आता अति जलद गतीने कामे होतील असे कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले तसेच नवीन पोलिस वाहन आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ही मोठा उत्साह दिसून येत होता. असेच लवकरात लवकर कर्मचारीही मिळावेत अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत