कोपरगाव शनिवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी शहर सहकारी बँक अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन च्या सभेमध्ये कोपरगाव पीपल्स बँकेच्या चेअरमन...
कोपरगाव
शनिवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी शहर सहकारी बँक अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन च्या सभेमध्ये कोपरगाव पीपल्स बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्येन मुंदडा यांचा सत्कार जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सीए गिरीशजी घैसास यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी राज्य बँक फेडरेशन च्या संचालिका सौ मेधा ताई काळे ,अंबिका महीला बँकेच्या चेअरमन सौ आशाताई मिस्कील, अहमदनगर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन श्री संजयजी गांधी , शहर सहकारी बँकेचे चेअरमन गिरीश जी घैसास, कोपरगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन सुनील भाऊ कंगले , पारनेर बँकेचे श्री शिवाजीराव व्यवहारे , भिंगार अर्बन बँकेचे श्री नाथा भाऊ राऊत, ऑडिटर श्री पटणी व इतर संचालक उपस्थित होते
सदर सभेमध्ये नवीन बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट , रिझर्व बँकेचे नवीन सर्क्युलर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट , नोकर भरती, मॅनेजिंग डायरेक्टर व पूर्णवेळ संचालक इत्यादी विविध विषयावर चर्चा झाली असोसिएशनचे अध्यक्ष सीए गिरीश जी घैसास यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथाभाऊ राऊत यांनी आभार मानले.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत