सात्रळ येथे प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने श्रावणी सोमवारनिमित्त वृक्षारोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने श्रावणी सोमवारनिमित्त वृक्षारोपण

सोनगाव सात्रळ/वेबटीम: प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय च्या  अध्यात्मिक  ज्ञान एवंम राजयोग  प्रशिक्षण  केंद्र सात्रळ येथे  श्रा...

सोनगाव सात्रळ/वेबटीम:

प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय च्या  अध्यात्मिक  ज्ञान एवंम राजयोग  प्रशिक्षण  केंद्र सात्रळ येथे  श्रावणी  सोमवार  निमित्त  वृक्षारोपणाचा  कार्यक्रम  पार पडला. उपस्थित  असलेल्या मान्यवरांच्या  हस्ते केंद्राच्या  वास्तू लगत  हे वृक्षारोपण  करण्यात आले. प्रास्ताविकेत ब्रह्मकुमारी  पद्माबहेन यांनी  भगवान शंकराचे माहात्म्य  व वृक्षरोपणाचे प्रयोजन  सांगितले.  ब्रह्मकुमार विष्णुभाई यांनी ग्रामविकास व वृक्ष महत्व व  वृक्षरोपणाची निसर्गातील ऑक्सिजन ची  वाढ  होण्यासाठी चे उपयोग हे संबोधित  केले. केंद्राचे  रामनाथभाई  आरोटे  यांनी प्रजापती  ब्रह्मकुमारी  ईश्वरीय  विश्व  विद्यालय यांच्या  विविध उपक्रमांची सखोल  माहिती सांगून श्रोत्यांना  मंत्रमुग्ध  केले. 

या प्रसंगी सात्रळ  चे सरपंच  सतिष  ताठे, ऍड. बाळकृष्ण  चोरमुंगे, कृषिपंडित  विठ्ठलराव कडू, विजुभाऊ  कडू, पांडेजी, कारभारी ताठे,ग्रामपंचायत चे जेष्ठ  सदस्य  रमेश पन्हाळे, जे. पी. जोर्वेकर, वसंतराव  डुकरे, संजय  नागरे, बाळासाहेब  गांधी, संतोषशेठ  लोढा, संजू शेठ  शिंगवी, चंदन  ताठे, हिरानंदानी तसेच  विश्व  विद्यालयाचे जेष्ठ शिवाजीभाई, स्वताबहेनजी, अर्पणा बहेनजी, रामभाई, प्रकाशभाई वालझाडे, गीतेभाई, सजनभाई, शेजवळ सर, मंगलताई  चोरमुंगे तसेच इतर  महिला  व ग्रामस्थ  हजर  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत