कोपरगावातील खडकी भागात आ.काळे यांच्याकडून तातडीने मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावातील खडकी भागात आ.काळे यांच्याकडून तातडीने मदत

  कोपरगाव   गेल्या चार-पाच दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात  सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी अचानक पणे शहरात दुपारी तीन नंतर संपूर्ण काळो...

 कोपरगाव 



गेल्या चार-पाच दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात  सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी अचानक पणे शहरात दुपारी तीन नंतर संपूर्ण काळोख पसरताच  साधारणपणे तीन वाजून तीस मिनिटांनी शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुमारे एक ते दीड तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील गल्ली-बोळं, रस्ते-नाले पाण्याने तुडुंब वाहत असल्याचे दृश्य शहरात दिसत होते.

  शहरातील खडकी भागात एक अतिवृष्टी सदृश्य पावसाने हाहाकार माजवत संपूर्ण खडकी परिसर  जलमय होऊन गेला होता येथील रस्त्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दृश्य पहावयास मिळत होते.हा वाढता पाण्याचा लोंढा वस्तीत घुसून घराच्या पायऱ्यांना स्पर्श करत करत घरात घुसू पाहत होता. ही वाढती पाण्याची परिस्थिती बघून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ ही भयावह  होवू पाहणारी परिस्थिती आमदार आशुतोष काळे यांच्या कानावर घातली. आमदार काळे यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खडकी भागातील पाण्यास  मोकळी वाट करून देण्यासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून  दिले. 


 सदर घटनास्थळी स्थानिक नागरिकां सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव शहर पदाधिकारी उपस्थित होते.

आ काळे यांनी तत्काळ जेसीबी मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे पाण्याची वाट मोकळी करत घरात येऊ पाहणाऱ्या पाण्याचा धोका टळाला या मुळे स्थानिक नागरिकांनी कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत