कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे सत्तेत आल्या पासून स्वतंत्र दिनी अथवा प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मा...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे सत्तेत आल्या पासून स्वतंत्र दिनी अथवा प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान स्वतः न घेता आपल्या कर्मचाऱ्यांना देत असतात.
आज दि १५ ऑगस्ट रोजी भारत मातेच्या ७५ व्या स्वतंत्र दिनी झेंडा वंदन करण्याचा मान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना असतांना देखील त्यांनी या ही वर्षी ध्वजारोहण स्वतः न करता नगरपरीषदेचे जेष्ठ कर्मचारी राजेश गाडे यांना देत गाडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन केले.
तसेच नगरपालिकेच्या स्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयात देखील नगराध्यक्ष वहाडणे यांनी स्वतः ध्वजारोहन न करता शाळेच्या दोन मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थीनीना ध्वजारोहन करण्याचा मान देत त्यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्वच्छता सर्वेक्षण मधे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,उप-मुख्याधिकारी सुनील गोर्डे व सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी-नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच भाजपा चे वसंत स्मृती कार्यालय येथे सुप्रसिद्ध कलाकार किरण परीख यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत