पानेगावात पार पडले भर पाऊसात कोवीड लसीकरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगावात पार पडले भर पाऊसात कोवीड लसीकरण

 पानेगाव(वेबटीम) अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अध...

 पानेगाव(वेबटीम)

अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आर. पी कसबे पानेगावचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले कोवीड लसीकरण करण्यासाठी मोठे योगदान लाभत आहे.


सलग तीन दिवसांपासून पाऊसाची हजेरी लावत असून दि. २१ रोजी सकाळ पासूनच मुळाथडी परीसराबरोबरचं पानेगावतही चांगल्या प्रकारे पाऊस कोसळत होता. सकाळ पासूनच पानेगाव जिल्हा परिषद शाळेत वृद्ध ,महिला , पुरुष,युवकांची उपस्थितीती होती. भर पाऊसात आरोग्य कर्मचारी हे गावा मध्ये येवून लसीकरण केले. येथील संयोजक संदिप जंगले, अनिल जंगले गावातील वृद्ध महिला पुरुष युवकांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी परिश्रम घेत असतात.लसीकरणाच्या वेळी संबंधितांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करुन त्यांना बोलावून घेतले जाते. 


असा चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध काम केल्यास कोवीड लसीकरण मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संयोजकांनी प्रत्येक गावामध्ये पुढं आले पाहिजे आरोग्य पर्यवेक्षक डॉ.रमेश जावळे यांनी सांगितले. यावेळी आशा सेविका विमल वाघमारे, रंजना वाघमारे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रज्ञा आव्हाड, आरोग्य सेविका मिनल पाटील,मिरा गायकवाड, डॉ राजेंद्र पाटोळे, डॉ जनार्दन देठे, वैद्यकीय अधिकारी डॉ भिमा चेके, डॉ विरकर, लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, उपसरपंच रामभाऊ जंगले, बाबासाहेब गुडधे, विशाल जंगले सुनील चिंधे, बाबासाहेब शेंडगे आदी परिश्रम घेतले आहे.

 अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिलभाऊ गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोवीड लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पडत असून पानेगावात लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले तसेच संयोजक संदिप जंगले, अनिल जंगले गावात ऑनलाइन नोंदणीसाठी मोठे योगदान लाभत असून जिल्ह्यातील पत्रकार बंधू,गावातील संयोजकांनी  असाच प्रकारे नियोजन करावे जेणेकरून आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य होवून कोवीड लसीकरण मोहीम आणखी जलदगतीने होईल-.

-रंगनाथ जंगले ,-संचालक मुळा सहकारी साखर कारखाना, बाळासाहेब नवगिरे पाटील -जिल्हाप्रमुख महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत