लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात

कोपरगाव/प्रतिनिधी:- लायन्स क्लब व लिओ क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी राम थोरे...

कोपरगाव/प्रतिनिधी:-



लायन्स क्लब व लिओ क्लबच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी राम थोरे, सचिवपदी अक्षय गिरमे व खजिनदारपदी सुमित भट्टड तर लिओ अध्यक्षपदी आदित्य गुजराथी, सचिवपदी पृथ्वी शिंदे आणि खजिनदारपदी ध्रुव कुदळे यांना पद ग्रहण केले. 



या समारंभाचे ‘रामराज्य’ हे शीर्षक विशेष आकर्षण ठरले. तसेच या समारंभात फुले, रांगोळी, पणत्या, दिवाळीचे फराळ आणि जेवण्यासाठी पुरण पोळी आमटी असा एकंदरीत दिवाळीचा माहोल तयार करण्यात आला होता. भगवान श्रीराम अयोध्येत राज्य करण्यासाठी आल्यानंतर राज्यातील लोकांनी जशी दिवाळी साजरी केली होती तसे राम थोरे लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी विराजमान झाले म्हणून दिवाळी ही थीम ठेवण्यात आली असे कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉ. अभिजीत आचार्य यांनी सांगितले. मावळते अध्यक्ष सुधीर डागा यांनी मागील वर्षी केलेल्या सेवा कार्याचे अहवाल वाचन केले. द्वारका जालन यांच्या हस्ते पदग्रहण विधी पार पडला.

लायन्सचे हे नवीन वर्ष 1 जुलैपासून सुरू झाले असून आत्तापर्यंत डॉक्टर्स डे, सी. ए. डे, कृषी दिन, वृक्षारोपण, निराधारांना ताडपत्री वाटप, आशा सेवकांचा सत्कार तर येणार्‍या काळात ब्लड डोनेशन कॅम्प, वृक्षारोपण, निराधार बालकांना शिक्षण, पाणपोई असे विविध उपक्रम करण्याचा मानस राम थोरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी लायन म्हणून सोमनाथ सोनवणे, प्रशांत भास्कर, सिद्धेश कपील, योगेश वरखेडे, तुषार घोडके, सचिन शिनगर, कुणाल घायतडकर, कुलदीप देशमुख, अमित नाईकवाडे, सुमित जगताप, विशाल जगताप तर लिओ म्हणून रोहित काले, माधव बजाज, हृषीकेश क्षत्रिय, संकेत वीसपुते, मल्हार टिळेकर, अंकित कृष्णानी, प्रणव गुजराथी, श्रेयस लाडे यांना संतोष माणकेश्वर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. श्रीनिवास पगडाल, तुलशीदास खुबाणी, राजेश ठोळे, संदीप कोयटे, सत्येन मुंदडा, संदीप रोहमारे, सुधीर डागा, विजय नानकर, भीमजी पटेल, रवींद्र नेवगे, डॉ. विलास आचारी, दिलीप वाबळे, सुरेश शिंदे, विजय गवांदे, पंकज ठोळे आदी उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. अभिजीत आचार्य व धीरज काराचीवला यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे व प्रसाद भास्कर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत