राहुरी तालुक्यात शिवसेनेला मरगळ ; नव्याने बांधणी करण्याची गरज ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यात शिवसेनेला मरगळ ; नव्याने बांधणी करण्याची गरज !

 राहुरी : वेबटीम                        राहुरी तालुक्यात काही दिवसांपासून निष्क्रिय लोकांमुळे शिवसेनेला मरगळ आली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख ...

 राहुरी : वेबटीम   


                   
राहुरी तालुक्यात काही दिवसांपासून निष्क्रिय लोकांमुळे शिवसेनेला मरगळ आली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेता तातडीने हकालपट्टी मोहीम हाती घ्यावी व नवतरुणांना संधी देऊन पक्ष उभारण्यास आणखी ताकद द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांमधून होत आहे.

  राहुरी तालुक्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्व शिवसैनिक जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र तालुक्यात सक्षम नेतृत्व नसल्याने शिवसेनेला मरगळ आली आहे, कुठंही शिवसेना मोठ्या पदावर दिसून येत नाही, कुठंही संघटन वाढलेले दिसत नाही, किंवा तसा प्रयत्न झालेला नाही.  गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम कागदावर आहे, केवळ खेवरे यांच्यावरील प्रेमापोटी शिवसैनिक काम करत आहेत. काही महिन्यांवर  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आली आहे, या पार्श्वभूमीवर तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप मोर्चेबांधणी करत आहेत. युवकांचे संघटन करत आहे, मात्र शिवसेनेत सध्या सन्नाटा आहे. त्यामुळे तालुक्यात  शिवसेनाचीही नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे, निष्क्रिय लोकांना पक्षातून हकलून त्या जागी प्रामाणिक लोकांना संधी देण्याची गरज आहे. लवकरच एक शिष्टमंडळ याकामी खेवरे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आलीं आहे. राहुरी तालुका शिवसेना प्रमुख पदासाठी अनेक इच्छुकांची नावे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासमोर येणार आहेत. या नावाची  मातोश्रीवर चर्चा होऊन त्यात तालुका प्रमुख निवडीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.या प्रक्रियेला लवकरच गती येईल, असा शिवसैनिकाना विश्वास आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत