राहुरी प्रतिनिधी राहुरी शहर हद्दीतील एका १८ वर्षीय तरूणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने एका महिलेने नग्न फोटो, व्हिडीओ व अश्लील चॅटींग यांच...
राहुरी प्रतिनिधी
राहुरी शहर हद्दीतील एका १८ वर्षीय तरूणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने एका महिलेने नग्न फोटो, व्हिडीओ व अश्लील चॅटींग यांचे मोबाईलवर स्टेटस ठेवून सार्वजनिकरित्या प्रसारित केल्याची घटना नूकतीच उघड झाली आहे. याबाबत निलम नामक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निलम नामक महिलेने राहुरी शहर परिसरात राहणाऱ्या एका प्रतिष्ठित घरातील १८ वर्षीय तरूणीची व तिच्या वडिलांची बदनामी करण्याच्या हेतूने नग्न फोटो, व्हिडीओ तसेच अश्लील चॅटिंग असलेले मेसेज तिच्या मोबाईलवरील स्टेटसवर ठेवून सार्वजनिक रित्या प्रसारित केले. याची खबर मिळताच त्या तरूणीने आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलिसात धाव घेतली. निलम संजय म्हसे ही महिला पाच वर्षापूर्वी राहुरी येथे राहत होती. तिने फेब्रुवारी २०२० ते आज पर्यंत सदर १८ वर्षाची तरूणी व तिच्या वडिलांची बदनामी करण्याच्या हेतूने निलम नामक महिलेने नग्न फोटो, व्हिडीओ व अश्लील चॅटींग तिच्या मोबाईलवरील स्टेटस ला ठेवले. त्या मुलीच्या नातेवाईकांनी तसेच मित्र मैत्रिणींनी ते फोटो पाहून तिला प्रसारित होत असलेल्या फोटो व व्हिडीओ बाबत सांगितले. सदर मुलीने तिच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. तेव्हा त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसा समक्ष घडलेला प्रकार कथन केला.
सदर १८ वर्षीय तरूणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी निलम संजय म्हसे हिच्या विरोधात सायबर कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे स्वतः करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत