डॉ. तनपुरे कारखाना कामगार युनियन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी खडसावले! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ. तनपुरे कारखाना कामगार युनियन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी खडसावले!

राहुरी फॅक्टरी (वेबटीम)   डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या उपोषणाकडे खा.डाँ.सुजय विखे यांच्यासह संचालक मंडळ व युनियन व कृती समिती पदाधि...

राहुरी फॅक्टरी (वेबटीम)

  डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या उपोषणाकडे खा.डाँ.सुजय विखे यांच्यासह संचालक मंडळ व युनियन व कृती समिती पदाधिकारी आदींनी पाठ फिरविल्याचा निषेध केल्याची बातमी सोशल मिडीयावर फिरताच युनियन व कृती समितीचे पदाधिकारी यांनी खा.विखे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा तपशिल उपोषणकर्ते कामगारांसमोर मांडला. उपोषणकर्ते कामगारांनी युनियन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुटपी भुमिका बंद करुन गाजर दाखवित असल्याबद्दल खेद व्यक्त केला.

डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी सोमवार पासुन उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी सकाळी खा.डाँ.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. बैठकी नंतर युनियन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी नर्सिंग होमच्या प्रागंणात चर्चा केली. खा.विखे यांच्यासह संचालक व युनियन, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यां कामगाराकडे पाठ फिरविली. याचा उपोषणकर्त्या कामगारांनी जाहीर धिक्कार करुन निषेध केला. याचे वृत्त सोशल मिडीयावर दिसताच युनियन व कृती समितीचे पदाधिकारी उपोषणस्थळी हजर झाले.

                 यावेळी खा.डाँ.विखे यांच्या समवेत झालेल्या चर्चेचा तपशिल युनियचे पदाधिकारी अर्जुन दुशिंग उपोषणकर्त्या समोर मांडताना सांगितले की,विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली आहे.कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्याने संचालक व कामगार यांच्या मध्यस्थाची भुमिका युनियन पार पाडीत आहे.कामगारांनी त्याग केला आहे.युनियनचे पदाधिकारी न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहे.खा.विखे यांनी सांगितले की, कामगारांचे 25 कोटी 36 लाख देणी नाही.जी देणी आहे हिशोब पाहुण देण्यात येईल.7 मे पासुन कोरोनामुळे कामगारांना कमी केले आहे.प्रवरा व कोपरगावचे कामगार तनपुरे कारखान्यात कामावर घेतले आहे.आँगस्ट उजडला तरी राहुरीच्या कामगारांना कामावर घेतले नाही. त्यासाठी युनियन प्रयत्न करीत आहे.सरकारने कारखान्यावर प्रशासक आणला तर पैसे गुंतवायचे की नाही. या बाबत दोन दिवस निर्णय घेण्यासाठी वेळ खा.विखेंनी मागितली आहे.कामगारांची संपुर्ण माहिती समोर आल्यावरच उपोषणकर्त्यांना भेटणार असल्याचे खा.विखे यांनी सांगितले आहे. असे दुशिंग यांनी सांगितले.

                  कामगार कृती समितीचे पदाधिकारी चंद्रकांत कराळे म्हणाले की, कामगार मेटाकुटीस आला आहे. पोटात दुःखत असल्याने उपचारासाठी उपोषण सुरु केले आहे.कामगारांच्या हातात काहीतरी मिळाले पाहिजे.कामगारांचा भविष्य निर्वाह रक्कम भरली जात नाही. कारखाना ताब्यात राहणार आहे की नाही हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.खा.विखे सकारत्मक तोडगा काढतील असे कराळे यांनी सांगितले.

               उपोषणकर्ते कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी सांगितले की,कामगार प्रशासनातील मध्यस्थतीची भुमिका युनियन व कृती समिती करत आहे. युनियन व कृती समिती प्रशासनाच्या वतीने येवून गाजर दाखवित असल्याने त्याचा सर्व कामगारांच्या वतीने खेद व्यक्त करीत आहोत. खा.विखे उपोषणकर्त्या कामगारांसमोरुन गेले. आमच्याकडे पाठ फिरविता हा कामगारांचा अपमान नाही का? हि खेदाची गोष्ट आहे.खा.विखे व संचालक मंडळ कामगाराच्या मयतीला येणार आहे का ? असा सवाल करत युनियन कामगारांबरोबर आहे तर उपोषणकर्त्या कामगारांबरोबर का दिसत नाही.

सोमवारी कृती समितीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.मंगळवारी सकाळी माञ गायब झाल्याने कामगारांत तोडफोड सुरु झाली आहे. खा.विखे यांनी प्रश्न सोडला नाही, तर युनियन व कृती समितीने  भुमिका जाहिर करावी.संचालक मंडळाची सुपारी घेतल्या प्रमाणे युनियन व कृती समिती वागत आहे.विखे यांच्या एका खिशात केंद्र तर दुसऱ्या खिशात राज्य सरकार आहे.तर कामगारांचे पैसे द्यायला कोणी हाथ बांधले का? कामगारांसमोर युनियन व कृती समितीने संचालक व विखे यांची बाजु मांडण्याचा प्रकार निंदणीय आहे.युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत. अशी पेरणे यांनी मागणी केली.

             आंदोलनस्थळी युनियनचे पदाधिकारी अर्जुन दुशिंग,बाळासाहेब ढोकणे,सुरेश थोरात,दिलीप कोहकडे, बाळासाहेब मुसमाडे, कृती समितीचे चंद्रकांत कराळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत