नगरसेवक जनार्दन कदम यांची सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या राज्य कार्यकारणीत महासंघटकपदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगरसेवक जनार्दन कदम यांची सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या राज्य कार्यकारणीत महासंघटकपदी निवड

कोपरगाव सकल मराठा सोयरीक ग्रुप मराठा समाजातील राज्यातील एकमेव सक्रीय सोयरीक जुळवणारा ग्रुप म्हाणून सर्वांना परिचित आहे. मागील सात  वर्षात के...

कोपरगाव

सकल मराठा सोयरीक ग्रुप मराठा समाजातील राज्यातील एकमेव सक्रीय सोयरीक जुळवणारा ग्रुप म्हाणून सर्वांना परिचित आहे. मागील सात  वर्षात केवळ सोशल मिडीयावर अवलंबून न राहाता अगदी समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत सोयरीक ग्रुपचे मजबूत जाळे तयार केले असून समाजातील अनुरूप व अपेक्षानुसार स्थळे मिळवून देण्यासाठी सकल मराठा सोयरीक ग्रुपकडे पहिले जात असून सोयरीक ग्रुपची राज्यस्तरीय कार्यकारित जाहीर झाली असून त्यात कोपरगाव तालुक्यातील नगरसेवक म्हणून सदैव कार्यतत्पर असणारे व समाजाच्या अनेक सामाजिक कार्यात सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे ओळख कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक श्री जनार्दन कदम यांची सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत महासंघटक पदी निवड झाल्याची माहिती सोयरीक ग्रुपचे समन्वयक जयकिसन वाघ यांनी दिली. 

जनार्दन कदम यांनी कोपरगाव तालुक्यातील मराठा समाजासोबत असणाऱ्या घनिष्ट संबंधातून कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शिबिरे, वधू वर मेळावे आदींचे नियोजन करून सामाजिक कार्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. 


तसेच नगरसेवक म्हणुन काम करताना प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कामे करीत असताना समाजाशी घट्ट नाळ जुळलेली आहे. त्यामुळे पुढील काळात कोपरगाव तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यातही सकल सोयरीक ग्रुपला निश्चितच फायदा होणार आहे व विवाह जुळवून देणे, सोयरीक ग्रुपचे संघटन मजबूत करणेकामी मोलाचे सहकार्य मिळणार आहे.



राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणुन शिर्डी येथील माजी प्राचार्या  सौ.रजनीताई गोंदकर तर अहमदनगर येथील सौ.मायाताई जगताप आणि श्रीगोंदा येथील बाळासाहेब भोर यांची उपाध्यक्ष म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. राज्यभरातील जेष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची फळी निर्माण व्हावी, पुढे चालून या युवकांनी नेतृत्व करावे या भावनेने सकल मराठा सोयरीक ग्रुपची नवीन राज्य कार्यकारिणी


गठीत करण्यात आली असल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज विविध संघटना कडून अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत