ठाकरे लाट येऊन भविष्यात विधानसभेवर भगवा फडकेल -जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ठाकरे लाट येऊन भविष्यात विधानसभेवर भगवा फडकेल -जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे

  कोपरगाव प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी देशातील मुख्यमंत्र्यामध्ये सर्वात अ...

 कोपरगाव प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी देशातील मुख्यमंत्र्यामध्ये सर्वात अव्वल दर्जाचे काम करीत जनतेचा विश्वास मिळविल्याने भविष्यात ठाकरे लाट येऊन विधानसभेवर भगवा फडकेल असा विश्वास जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे यांनी पुणतांबा गटात झालेल्या शिवसंपर्क अभियान व शिंगवे शाखा बोर्ड उदघाटन प्रसंगी व्यक्त केला.




     देश कोरोनाच्या संकटात आहे राज्यात पुराचे थैमान सुरु असतांना शेतकरी कष्टकरी संकटात असतांना मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी इतिहासात नोंद होईल असे काम केले आहे.


या काळात शिवसेनेने लोकाभिमुख सामाजिक काम करुन गाव तेथे शिवसेना शाखा स्थापन करून गावागावात शिवसैनिक पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांचे आदेशाने शिवसेना प्रमुखांच्या ८०% समाजकारण २०% राजकारण या धोरणानुसार काम करत आहेत त्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला संकटकाळात आला.  कोपरगाव विधानसभा मतदार संघात राहता तालुक्यातील ११गावे समाविष्ट केले आहेत.  

      शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियाना बरोबरच शिवसेना शिंगवे शाखेचा बोर्ड उदघाटन कार्यक्रम जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. 




यावेळी जेष्ठ शिवसेना नेते माजी जिल्हाप्रमुख सुहासराव वहाडने ,कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, राहता तालुका प्रमुख संजय  शिंदे, जेष्ठ नेते कमलाकर कोते,माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका सचिव अशोकराव कानडे ,जिल्हा संघटक विजय काळे,तालुका कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात ,उपतालुका प्रमुख भास्कर मोटकर, कोपरगाव शहरप्रमुख कलविंदर दडीयाल ,पुणतांबा शहर प्रमुख महेश कुलकर्णी,युवा नेते विक्रांत झावरे,शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाचे राहुल देशपांडे,जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब चौधरी ,राजेंद्र वाळुंज अनिल शेळके, रवि बाभूळके,सुनिल ठोंबरे, नितीन सुराळकर ,हर्षद चौधरी, रविंद्र गोसावी,राजेंद्र चौधरी,गणेश पटारे,किरण सुराळकर यांचे सह शिवसैनिक, युवक, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत