देवळाली प्रवरा(प्रतिनिधी) वाढदिवस म्हंटल की, डामडौल, मोठा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी या सर्व गोष्टी नक्की बघायला मिळतात परंतु या सर्व गोष...
देवळाली प्रवरा(प्रतिनिधी)
वाढदिवस म्हंटल की, डामडौल, मोठा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी या सर्व गोष्टी नक्की बघायला मिळतात परंतु या सर्व गोष्टीला फाटा देऊन देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगरसेविका केशरबाई खांदे यांच्या नातीच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने देवळाली प्रवरा नगरपालिकेला १५० वृक्ष भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगरसेविका केशरबाई खांदे यांची नात तथा भाजप युवा कार्यकर्ते सागर खांदे यांची कन्या अनन्या हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी सकाळी देवळाली प्रवरा नगरपालिकेला खांदे परिवाराच्यावतीने आंबा, सीताफळ, पेरून आदिंसह विविध फळांची १५० वृक्षरोपे भेट देण्यात येऊन अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजीत कदम, मुख्याधिकारी अजित निकत, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, नगरसेवक सचिन ढुस, भारत शेटे, ज्ञानेश्वर वाणी,सचिन सरोदे,अमोल कदम, नगरसेविका अंजली कदम, सुजाता कदम, केशरबाई खांदे, आरती खांदे, संगीता चव्हाण, बन्सी वाळके, रावसाहेब खांदे, सागर खांदे, मुक्ताराम शेळके, बाबादेव शेळके आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी खांदे परिवाराने वाढदिवसानिमित्त राबविलेल्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून वाढदिवसानिमित्त इतर अन्यावश्यक खर्च पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे असे आवाहन माजी आमदार कदम यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत