आंबी(वेबटीम) श्रीरामपूर तहसील कार्यालयांतर्गत येत असलेल्या बेलापूर खुर्द येथील कोतवाल सुनिल बारहाते यांचा नुकताच माजी मंत्री राधाकृष्ण विखे ...
आंबी(वेबटीम)
श्रीरामपूर तहसील कार्यालयांतर्गत येत असलेल्या बेलापूर खुर्द येथील कोतवाल सुनिल बारहाते यांचा नुकताच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 'कोरोना योद्धा' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मागील दीड वर्षापासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेल विविध क्षेत्रातील कोरोना योद्धयांनी प्राणाची बाजी लावून काम केले. महसूल विभागातील कोतवालांनीही दिवस रात्र एक करून कोरोना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. बारहाते यांनी कोरोना काळात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, ग्रामस्थ यांमध्ये दुवा म्हणून काम केले. बारहाते यांनी तलाठी विकास शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन बेलापूर येथील राधाकृष्ण विखे पाटील मित्रमंडळाने त्यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. बेलापूर खुर्दचे उपसरपंच दीपक बारहाते, अनिल गाढे, समीर सय्यद, गणेश संचेती, विलास भालेराव यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. सुनिल बारहाते यांचे श्रीरामपूर तालुका तलाठी संघटना, कोतवाल संघटना यांसह श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
"कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केल्याने कोरोना काळात मेहनत घेतल्याचे चीज झाल्यासारखे वाटते आहे. याकामी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, महसूल नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ, मंडलाधिकारी चांगदेव बोरुडे, तलाठी विकास शिंदे यांचे सहकार्य लाभले. बेलापूर खुर्द येथील राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाचे विशेष आभार."
- सुनिल बारहाते (कोतवाल बेलापूर खुर्द)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत