गोदामाईतील पवित्र स्नानानंतर कपडे बदलण्यास व्यवस्था करावी! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोदामाईतील पवित्र स्नानानंतर कपडे बदलण्यास व्यवस्था करावी!

कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातून पवित्र दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेली गोदावरी वाहते. सध्या आखाड मास सरला असून, श्रावण मास सुरू होणार आहे. या पार्...

कोपरगाव/प्रतिनिधी:-

शहरातून पवित्र दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेली गोदावरी वाहते. सध्या आखाड मास सरला असून, श्रावण मास सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना गोदामाईतील स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी पालिके व्यवस्था तयार करुन द्यावी, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.



याबाबत गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ढाकणे यांनी गुरुवारी (ता.5) नगराध्यक्ष वहाडणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या श्रावण मासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मासात तालुका आणि शहरातील असंख्य भाविक गोदामाईमध्ये स्नान करतात. असे महिनाभर देव-दर्शन, पूजन सुरू असते. मात्र, भाविकांना स्नानानंतर कपडे बदलण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने पालिकेने लवकरात लवकर ही व्यवस्था उभी करुन द्यावी, अशी मागणी ढाकणे यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनाही देण्यात आलेले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत