जेऊरकुंभारी संजयनगर भिमसाम्राज्य सेना संघटनेचे कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन !! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जेऊरकुंभारी संजयनगर भिमसाम्राज्य सेना संघटनेचे कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन !!

कोपरगाव प्रतिनिधी     शिक्षणातून समाजाच्या उन्नतीचे साधन निर्माण करण्यात घटनेचे शिल्पकार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे काम केले.  त...

कोपरगाव प्रतिनिधी

    शिक्षणातून समाजाच्या उन्नतीचे साधन निर्माण करण्यात घटनेचे शिल्पकार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे काम केले.  तेच विचार युवकांनी आत्मसात करून संघर्ष, क्षमा, शीलतेतून  सर्वसमावेशक प्रगती साधावी असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजपा युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

              तालुक्यातील जेऊर कुंभारी परीसरातील संजयनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) प्रेरीत भीमसाम्राज्य सेना संघटनेचे उद्घाटन विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी आर.पी.आय.प्रदेश सचिव दीपक गायकवाड यांनी प्रास्ताविकात आजवर कोल्हे कुटुंबियांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत संघटना स्थापनेचा विचार मांडला.  या याप्रसंगी राज्य संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव,  मार्गदर्शक बाबुराव काकडे, माजी संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजीराव वक्ते,आनंदराव चव्हाण,  सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच जालिंदर चव्हाण, 


भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते,शिर्डी शहराध्यक्ष कैलासराव शेजवळ,जिल्हा अध्यक्ष आर पी आय  पप्पू भाऊ बनसोडे, नगरसेवक  तालुका अध्यक्ष आर पी आय  नानाभाऊ त्रिभुवन,  संतोष होणे, रमेश गायकवाड , देवराम पगारे,  शब्बीर भाई सय्यद ,रविभाऊ शेजवळ, वहाळ   विजय काकडे , सचिन वाघमारे सुमित वाघमारे आदी उपस्थित होते . विवेक कोल्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चाचे  तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांचा सत्कार करण्यात आला.

   श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले  की, भिम साम्राज्य सेना ही समाज हितासाठी आहे. समाजाचे प्रश्न या संघटनेच्या माध्यमातून सोडवले जाईल समाजिक काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्यात आपण स्वतः लक्ष घालून ते सोडवू.    कार्याध्यक्ष सुमित भाऊ पगारे, शाखाअध्यक्ष सागर  गायकवाड यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  पंचक्रोशीतील ग्रामस्थ , माजी उपसरपंच यशवंतराव आव्हाड, बाबुराव काकडे, किशोर गायकवाड, किरण गायकवाड, शशिकांत गुरसळ, नितीन इंगळे, भाऊसाहेब वक्ते, विजय   सुपेकर, भास्कर वाकुडे , किसन गायकवाड, दिलीप पगारे, देवराम पगारे, रमेश कजबे, सचिन वाघमारे, विकी निळे,मोहन गाडेकर, निखील औताडे, रामा भालेराव, भगवान मोकळ  शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे सर्व  कार्यकर्ते आदी  याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत