राहुरीत रानभाजी वनभोजन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसादद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत रानभाजी वनभोजन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसादद

राहुरी प्रतिनिधी-  रान भाजी वनमहोत्सव आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून त्याचे मार्केटिंग होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची...

राहुरी प्रतिनिधी-

 रान भाजी वनमहोत्सव आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून त्याचे मार्केटिंग होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी दयानंद जगताप यांनी व्यक्त केले .                                               


      आज(13 शुक्रवार )रोजी राहुरी तालुक्यात ट्राय फार्म बारागाव नांदूर रोड येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने रानभाज्या वन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रकल्प उपसंचालक आत्मा आर के गायकवाड ,उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप , तहसीलदार फसीउद्दिन शेख आदी त्या वेळी उपस्थित होत.

        प्रांताधिकारी जगताप म्हणाले की ,शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे .हा उपक्रम स्तुत्य असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली .यावेळी बोलताना तहसीलदार फसिऊद्दिन शेख म्हणाले की, वन भाज्या महोत्सवामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाज्या पाहण्याची संधी यानिमित्ताने शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे .


भाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यातून आरोग्य उंचावण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले .  तसेच महिला बचत गटाचे प्रतिनिधी कालेकर देखील उपस्थित होते.त्यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले .प्रास्ताविक राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी केले. त्यात त्यांनी पुढील वर्षी सात दिवसांचा महोत्सव ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली .

         यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले यांचे भाषण झाले. त्यांनी विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचे महत्त्व सांगितले आहे .सदर कार्यक्रमांमध्ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आठ ते नऊ प्रकारच्या रानभाजी च्या पाककृती करण्यात आल्या. व 150 नागरिकांनी त्याचं सेवन केलं .तसेच  रान भाजी महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी समाधान व्यक्त केले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत