केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध

कोपरगाव(वेबटीम) राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षे...

कोपरगाव(वेबटीम)

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे राणेंच्या अटेकेसाठी निवेदन देण्यात आले.  


     निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी जीभ घसरवून एकेरी भाषेत वक्तव्य केल्याने आम्हा शिवसैनिकांचे भावना दुखावल्या आहेत. हे वक्तव्य अशोभनीय असून लोकशाहीच्या विरोधात आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी तीव्र व एकमुखी मागणी करून यापुढे असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशाराही दिले आहे.


या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांना अमृतमहोत्सव हा शब्द आठवला नाही म्हणून नारायण राणेंची देशभक्ती जागृत झाली मग उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या पार्थिवावर असलेल्या भारताच्या झेंड्यावर भाजपचा झेंडा टाकला गेला तेव्हा ह्यांची देशभक्ती कुठे गेली होती.


    निदर्शने करतांना व निवेदन देतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,तालुकाप्रमुख विमलताई पुंडे, ,बाळासाहेब जाधव, वाहतूकसेना उपजिल्हाप्रमुख, उपशहरप्रमुख विकास शर्मा, भुषण पाटणकर, आकाश कानडे, संघटक बाळासाहेब साळुंके,व्यापारी सेनेचे योगेश मोरे, वैभव गिते,राहूल देशपांडे,सतिष शिंगाणे, विभागप्रमुख समीर शेख, गौरव गुप्ता, वैभव हलवाई, वाहतूकसेनेचे अविनाश धोक्रट, पप्पू पेकळे, प्रविण शेलार, किरण आडांगळे, सचिन जाधव, दत्तू लोणारी, संतोष लोणारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.


जनआशीर्वाद नव्हे तर जनभावना दुखावण्याची यात्रा

कानाखाली कशी द्यायची, हे शिवसेना दाखवून देईलच पण केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू केले असून त्या दरम्यान प्रत्येक वेळी मुख्यमंत्री तथा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य करून केवळ आम्हा शिवसैनिकांचे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचा राज्याचा अपमान केंद्रीय मंत्री नारायण राणे करत आहेत.  जनआशीर्वाद नव्हे तर जनभावना दुखावण्याची यात्रा असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत