अखेर जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द भागात वीजपुरवठा सुरळीत !! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अखेर जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द भागात वीजपुरवठा सुरळीत !!

  कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द या भागात काही दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी महावितरण अधि...

 

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द या भागात काही दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घातला होता,यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन महावितरण कडून या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, जेऊर कुंभारी, डाऊच  खुर्द या भागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या  अंदाजावर मका, सोयाबीन ही पिके घेतली होती पण पावसाच्या अनिश्चितीमुळे शेतकऱ्यांसमोर पीक कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण झाला होता त्यात काही शेतकऱ्यांच्या विहिरीला थोड्याफार प्रमाणात पाणी असताना देखील विजेअभावी ते पाणी देऊ शकत नव्हते, महावितरण अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले जास्त दाबाने वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली वीजवितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मागणी समजून घेतली व जेऊर कुंभारी डाऊच  खुर्द या भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे,जेऊर कुंभारी येथील माजी संचालक मधुकर वक्ते,  माजी सभापती शिवाजी वक्ते, माजी संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, उपसरपंच जालिंदर चव्हाण, भाजपायुवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते,रमेश वक्ते, यशवंतराव आव्हाड, बाजीराव पुगंळ, मच्छिंद्र पुंगळ, 


महेंद्र वक्ते, बापुराव वक्ते, शशिकांत गुरसळ, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते, भानुदास वक्ते, भाऊसाहेब वक्ते, नवनाथ गायकवाड,सतिश पवार,यांनी जेऊर कुंभारी भागात वीज सुरळीत केल्यामुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता खराटे साहेब,सहाय्यक अभियंता शेलार साहेब,तसेच कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बंधूंचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत